Budget 2019 : पायाभूत सुविधांवर सरकार करणार ‘एवढा’ खर्च ; ‘ग्रामीण-शहरी’ दरी होणार कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांवर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सरकार पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी येत्या ५ वर्षांत तब्ब्ल १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले. अशा पायाभूत सुविधांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी होऊ शकणार आहे. या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, घरे, रेल्वे इत्यादी चा समावेश आहे. तसेच सागरमाला, भारतमाला प्रकल्पांचा याकामी मोठा उपयोग होईल.

या क्षेत्रांतील पायाभूत सुविधांना मिळणार गती :

१. घरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचं घर देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील २०२१ पर्यंत १.९५ कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलं असून या घरांमध्ये गॅस, विज आणि टॉयलेटची व्यवस्था असणार असल्याचे सांगितले आहे. आता नवीन घर ११४ दिवसांत बनणार असून आधी हे लक्ष्य ३१४ दिवसांचे होते.

२. रस्ते : गावागावांमधील रस्त्यांना जोडण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये प्रधानमंत्री सड़क योजने अंतर्गत १.२५ लाख किलोमीटर रस्त्यांची निर्मिती होणार असून त्यासाठी ८० हजार २५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ९७ टक्के नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

३. रेल्वे : या वर्षी रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरु होणार आहे. २०१८ पासून २०३० पर्यंत रेल्वे च्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असणार आहे. त्यासाठी पीपीपी मॉडेल ने विकास घडवून आणण्याची योजना आहे.२०१८-१९ मध्ये ३०० किलोमीटर मेट्रो लाईन ला मंजुरी दिली गेली आहे. सरकार नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड देखील सुरु करणार आहे. ज्याद्वारे तिकीट बुक करणे अधिक सोपे होणार आहे.

४. वॉटरवे : सरकार आगामी चार वर्षांमध्ये गंगा नदीमध्ये कार्गो शिप ची आवक जावक वाढवणार आहे. नदी आणि समुद्राद्वारे होणाऱ्या वाहतुकीला सरकार प्रोत्साहन देणार असून यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी सागरमाला प्रकल्पातील योजनांचा वापर केला जाणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?