”देशातील प्रत्येकाने लघवी साठवली तर देशाचे ४० हजार कोटी वाचतील”

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘युरीनपासून युरिया, अर्थात मूत्रापासून खत या माझ्या कल्पनेवर लोकं हसले, पण त्यांना हसू द्या. देशातील प्रत्येकाने आपलं युरीन अर्थात लघवी साठवून त्यापासून युरिया तयार केल्यास, देशाचे 40 हजार कोटी वाचतील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरात सरपंच सम्राट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडकरींनी हे वक्तव्य केलं.

सरकारी वाहनांमधील डिझेल चोरीला जात आहे, हे वास्तव त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावरून त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला. देशात साखर अतिरिक्त आहे, डाळ अतिरिक्त आहे, तांदूळ अतिरिक्त आहे. म्हणून शेतीमालाला भाव मिळत नाही, सरकार कुणाचंही येवो, परिस्थिती तीच आहे, असं गडकरींनी यावेळी म्हटलं. गावात डॉक्टर नाही, डॉक्टर असला तर नर्स नाही, दोन्ही असले तर औषध नाही. मग कोण मरायला जाईल त्या दवाखान्यात’, असं म्हणत ग्रामीण भागातील आरोग्याबद्दल व्यथाच गडकरींनी सांगितली.

तसंच यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी नेत्यांच्या बदल्यांबाबतही त्यांनी आपले मत मांडले. नेते बदल्या करण्यात भिडून आहेत,बदल्या करणे नेत्यांचं आवडतं काम आहे, असं म्हणत भाजप नेत्यांना टोमणा मारला.

ह्याहि बातम्या वाचा

डी. रूपा देशातील पहिल्या रेल्वे पोलीस अधिकारी

केवळ मतांसाठी धनगर समाजाला ‘एसटी’ कोट्यातून आरक्षण देण्याचा घाट

Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून

पाकची ढवळाढवळ संपेना ! भारताच्या हद्दीत पुन्हा ड्रोन

एअर स्ट्राईकचे पुरावे जनतेसमोर राष्ट्रहितासाठी मांडले जावेत