Nitin Gadkari | भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा सुसज्ज करणार – नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) आणि वाहन उद्योग (Automotive industry) जगात पहिल्या क्रमांकावर जाईल. तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) तर सोडाच, पण उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमधील (Bihar) रस्ते देखील 2024 पर्यंत अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगले होतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले, की परिवहन विभागातील (RTO) भ्रष्टाचार संपला असून सागरी विमानाने मुंबईतील समुद्रातून उडून जयपूरच्या तलावात आणि तेथून कोलकात्यालाही जाता येईल, हे दिवसही आता फार दूर नसल्याचे ते म्हणाले. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) सर्व विद्युत बसगाड्या चालविल्या, तर सध्याच्या एकतृतीयांश तिकीटदरात देखील नफा कमावता येईल, असा दावा गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) 9 वर्षातील कामगिरीचे विश्लेषण करताना मोदी सरकारचे आर्थिक धोरण, काँग्रेस सरकारचे (Congress Government) स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक धोरण आणि या माध्यमातून देशाने केलेली प्रगती याचा सविस्तर आढावा घेतला.

पुढे गडकरी म्हणाले, की मुंबई-दिल्ली हे अंतर द्रुतगती महामार्गाने (Mumbai-Delhi Expressway) केवळ बारा तासात कापता येईल. भांडवल उभारणीची आता विशेष अडचण नसून बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) आणि पीपीपी (सार्वजनिक व खासगी भागीदारी) माध्यमातून रस्ते, विमानतळ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेकडो प्रकल्प राबविले जात आहेत. वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढत असून इथेनॉल निर्मितीमुळे (Ethanol Production) शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत आहे. त्यांचे उत्पन्न वाढत आहे. संपूर्ण इथेनॉलवर चालणारी टोयोटाची नवी मोटार ऑगस्टमध्ये भारतात बाजारपेठेत (Markets in India) दाखल होणार आहे.

Web Title :   Nitin Gadkari | union minister nitin gadkari claims that the country roads will be built better than america

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा