Nitin Landge Bribe Case | पिंपरी मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह 5 जणांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला, पिंगळेंनी दिला ‘त्या’ 16 जणांची नावे सांगण्यास नकार; जाणून घ्या सविस्तर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Nitin Landge Bribe Case | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समतीच्या अध्यक्षासह (Nitin Landge Bribe Case) इतरांचा पोलिस कोठडीतील मुक्काम सोमवारपर्यंत वाढला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (pcmc standing committee chairman adv nitin landge), त्यांचा PA ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (Dnyaneshwar Kisanrao Pingale) वय 56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे ( Arvind Bhimrao Kamble रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (Rajendra Jaywant Shinde रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (clerk Vijay Shambhulal Chawria) रा. धर्मराजनगर) यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै ‘वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारीबाबत आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी संबंधित 16 व्यक्तींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी व गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरपींच्यो पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.

 

तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या.
मात्र वर्क आॅर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार 10 लाख रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले.
त्यातील एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले.
एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.

 

Web Title : Nitin Landge Bribe Case | Five persons, including the chairman of Pimpri Municipal Corporation’s standing committee, were remanded in police custody. Pingale refused to name ‘those’ 16; Learn in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या

World Entrepreneurs’ Day | तुम्ही सुद्धा सुरू करू शकता आपला व्यवसाय, मोदी सरकार देईल 10 लाखाची मदत; जाणून घ्या