Nitin Landge Bribe Case | PCMC स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेंना ‘या’ तारखेपर्यंत अंतरिम जामीन, लांडगेंच्या PA सह इतर चौघांबाबत कोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Nitin Landge Bribe Case | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Corporation) होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (standing committee chairman adv Nitin Landge Bribe Case) यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 26 ऑगस्टपर्यंत जामीन देण्यात आला असून त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणातील इतर आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
त्यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
आरोपींची पोलिस कोठडीत संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. ॲड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi) आणि ॲड. गोरक्षनाथ काळे (Gorakshanath Kale) यांनी लांडगे यांच्यावतीने कामकाज पाहिले.
या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे. अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.
कौटुंबिक कारण्यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला.
त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 

इतर आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग (Adv. Vipul Dushing) , ॲड. कीर्ती गुजर (Adv. Kirti Gujar), ॲड. संजय दळवी (Sanjay Dalvi) यांनी कामकाज पाहिले.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे Dnyaneshwar Kisanrao Pingale (वय 56, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे Arvind Bhimrao Kamble (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे Rajendra Jaywant Shinde (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया Vijay Shambhulal Chawria (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक सीमा मेहेंदळे (Deputy Superintendent of Police Seema Mehendale) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Web Title : Nitin Landge Bribe Case | PCMC Standing Committee Chairman Nitin Landge granted interim bail till 26 august

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SIP Mutual Funds | 17500 रुपये गुंतवून तुम्ही सुद्धा बनू शकता 5 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे

Mahesh Manjrekar | प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त; मुंबईत झाली शस्त्रक्रिया

Pune Crime | पुण्यात चांदणे गँगच्या टोळक्याचा पूर्ववैमनस्यातून गुंडावर हल्ला, खडकी बाजार परिसरात दहशत पसरवून जीवे मारण्याचा प्रयत्न