NMDFC News | अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेड प्रक्रिया आता अधिक सुलभ; ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर

मुंबई : NMDFC News | केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत National Minorities Development and Finance Corporation (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या या योजनांमधील कर्ज परतफेडीसाठी आता ऑनलाईन सेवा विकसित करण्यात आली असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. (NMDFC News)

महामंडळाच्या कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत लाभार्थ्याकडून आगाऊ दिनांकित धनादेश घेण्यात येत होते. महामंडळामार्फत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्टेट बँक कलेक्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सहजरित्या व सुलभपणे करणे लाभार्थ्यांना शक्य झाले आहे. कुठुनही ऑनलाईन पध्दतीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याची पावती देखील ऑनलाईन पध्दतीनेच त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. (NMDFC News)

महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी State Bank Collect प्रणालीला प्राधान्य देऊन
त्याद्वारेच कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख (Dr Lalmiya Sharif Shaikh NMDFC) यांनी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना केले आहे.

Web Title :-  NMDFC News | Repayment process of loan schemes for minorities now easier; Effective use of online system

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई