कलरफुल असो वा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ आर्ची दिसते एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैराटमधून सर्वांच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु गेले अनेक दिवस पडद्यावर दिसत नसली तरी सोशल मीडीयावर ती सतत अ‍ॅक्टीव असते. रिंकू सोशल मीडियावरून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची काही माहिती असेल तर तीही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

https://www.instagram.com/p/B2-gVEvJbg7/

सध्या रिंकू राजगुरूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे रिंकूचा फोटो. नकुताच तिने इंस्टाग्रामवरून आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोची खासियत म्हणजे रिंकूचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोत रिंकू खूपच सुंदर दिसत आहे. तिने जिन्स आणि टीशर्ट घातला आहे. मोहक अशी पोज रिंकूने दिली आहे. आपल्या कॅप्शनमध्ये रिंकू म्हणते, “Imperfections create character.”

https://www.instagram.com/p/B3CCYxuJ9ba/

सैराटमधील आपल्या अभिनयाने रिंकूने सर्वांच्या मनात घर केले. या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. सध्या रिंकूने आपला मेकओव्हर केला आहे.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच ती कागर सिनेमात दिसली होती. रिंकू लवकरच आता मेकअप या सिनेमात दिसणार आहे. याचा टीजरही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात ती वेगळ्या आणि लुकमध्ये आणि बोल्ड अंदाजात दिसणार आहे. मेकअप सिनेमाच्या टीजरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सैराट सिनेमा येऊन 3 वर्षे झाली आहेत तरीही तिच्या लोकप्रियतेत कसलीच कमतरता जाणवत नाही.

https://www.instagram.com/p/B2yQNboJMQH/

https://www.instagram.com/p/B21m1MTpBCk/

https://www.instagram.com/p/B2i5gJMpbz7/

https://www.instagram.com/p/B2IbLu6JB6V/

Visit : policenama.com