करण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रग्सबाबचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर, जाणून घ्या काय सांगतो अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ( Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर या केसच्या तपासातून ड्रग्सचा (drugs) अ‍ॅंगल समोर आला होता. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. असे बोलले जात होते की, इंडस्ट्रीतील जास्तीत जास्त पार्ट्यांमध्ये मोठे सेलिब्रिटी ड्रग्स घेतात. अशातच 2019 मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून असे आरोप लावले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत. या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून (no-drugs-was-consumed-karan-johar-house-party) लावत या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरीच्या (Forensic Science Laboratory) अधिकाऱ्यांने करण जोहरच्या या पार्टीच्या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. सोबतच सांगितले की, या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा वापर झाला नाही. व्हिडीओत एके ठिकाणी पांढरी लाइन दिसत आहे. ज्यावरून दावा केला होता की, ती ड्रगची लाइन आहे. मात्र, फॉरेन्सिक तपास टीमने सांगितले की, ती ड्रग्सची लाइन नसून केवळ एका ट्यूबलाइटची सावली असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान करणने यापूर्वीही अनेकवेळा व्हीडीओबाबत स्पष्टीकरण दिल होते. तो म्हणाला होता की, त्याच्या घरी झालेल्या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा वापर केलेला नाही. करणच्या घरी झालेल्या या पार्टीत अभिनेत्री दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, मीरा राजपूत, वरूण धवन, झोया अख्तर आणि अयान मुखर्जी आदी स्टार सहभागी झाले होते.

कंगनाने केला दावा
दरम्यान बॉलिवूडमधील जास्तीत जास्त लोक ड्रग्स घेतात असा दावा अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. इतकेच नाही तर तिने रणवीर सिंह आणि रणबीर कपूरला टेस्ट करण्याचं आव्हानही दिले होते. त्यानंतर अनेकांनी असे दावे केले. या दाव्यांमुळे इंडस्ट्रीत दोन भागात विभागली गेल्याचेही दिसले. अनेक स्टार्सनी कंगनाच्या या वक्तव्याचा विरोधा केला होता.

You might also like