No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

मुंबई : No Dry Day On 4th June | लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यात खबरदारी म्हणून मुंबईत ४ जून रोजी दारुविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. या निर्णयाविरोधात दारू विक्रेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात निर्णय झाला. यामध्ये हायकोर्टाने (Mumbai High Court) मद्यप्रमी आणि दारू विक्रेत्यांना दिलासा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे, मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारुची दुकाने, बार बंद होते. शेवटच्या टप्प्यात मुंबईतील मतदानाच्या दिवशी वाईन शॉप, दारु दुकाने, पब यादिवशी बंद ठेवण्यात आले होते.(No Dry Day On 4th June)

४ जून रोजी देखील मतमोजणी असल्याने दारु दुकाने, वाईन शॉप व पब बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याविरोधात दुकान मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायालयाने विक्रेत्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. ४ जून च्या निकालाच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर दारुविक्रीला परवानगी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी