महाराष्ट्रात सुरू होणार नो मास्क, नो एन्ट्री : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रभावित होऊन संपूर्ण राज्यात ही अंमलबजावणी करण्याचा मानस केला आहे. ज्याच्याकडे मास्क नाही त्याला शासकीय कार्यालये व महत्वाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नाही. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी “मास्क नाही प्रवेश नाही” धोरण राबविणे सुरू केले आहे. तेथे मास्क नसलेल्या व्यक्तींना दुकानांमध्ये प्रवेश नाही. जे दुकानदार मास्क वापरात नाहीत त्यांच्याकडून मास्क खरेदी करु नका. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह येऊन बरे झाल्यानंतर काही लोक आपल्या गोष्टी लपवतात. मला काहीही होणार नाही अश्या पद्धतीने लोक वागत आहेत. या दोघांमधून आपल्यलाला कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाईल. महाराष्ट्राला आपले कुटुंब मानणारे सर्वजण यात सहभागी होतील.मराठवाडा, विदर्भ, खानदेश येथे कोविड आणि माझे कुटुंबीय, माझी जबाबदारी मोहीम याविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरील गोष्टी सांगितल्या. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अमित देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीस हजेरी लावली.

मुख्यमंत्र्यांनी जे मास्कचा वापर करत नाहीत त्यांना शिक्षा देण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. ब्रिटनमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल कला जातो. ग्रेट ब्रिटनसारख्या देशात अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तरीही सकारात्मक व्यक्ती घरीच उपचार घेत आहेत. दररोज त्यांची तपासणी केली जाते. त्रास झाल्यास तो रुग्णालयात दाखल केल्या जाते.आपल्या इथे असे कोणतेही लक्षण न आढळणारा व्यक्ति बाहेर फिरतो आणि त्यांच्यामुळे व्हायरस इतर अनेक लोकांपर्यंत पोहोचतो . असं म्हणतात की कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता जगभरात येत आहे. म्हणून सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. ज्याप्रकारे केरळ देशातील सर्वात शिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते.त्याचप्रमाणे आरोग्य शिक्षणामध्ये आपला महाराष्ट्रही आघाडीवर असावा. लोककलेतून विषय लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. नवरात्रोत्सव साधेपणाने व सुरक्षित राहून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.