एमएमआरडीएचा अहवाल : टॉप्स सिक्युरिटीकडून घोटाळा नाही; प्रताप सरनाईकांची झाली होती चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  एमएमआरडीएला टॉप्स कंपनीने 500 सुरक्षारक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षारक्षक कामावर येत होते. मात्र, तरीही सर्वच 500 सुरक्षारक्षकांचे वेतन काढले जातंय, असा आरोप रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे एफआयआरमध्ये केला होता. त्यानंतर या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएने खुलासा करताना या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे अहवालात म्हटलंय.

एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या अहवालात एमएमआरडीएने 2013 ते 2017 आणि 2017 ते 2020 या 6 वर्षातील निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतलाय. त्यापैकी 6 कंपन्यांना निविदा प्रक्रियेत मान्यता दिलीय. या 6 कंपन्यांपैकी एक टॉप्स सिक्युरीटी कंपनीही होती.

टॉप्स सिक्युरिटीला एमएमआरडीएने सुरक्षारक्षक पुरवण्याचे जे कंत्राट दिलं, त्या कंत्राटनुसार एमएमआरडीएला सुरक्षरक्षक पुरविले. या टॉप्स सिक्युरिटी कंपनीने पुरविलेल्या सुरक्षारक्षकांप्रमाणे निविदा प्रकियेत नमूद केल्याप्रकारे निधी दिलाय, असे या अहवालात म्हटलं आहे.

तसेच एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरवणार्‍या सर्व कंपन्यांचे जे सुरक्षारक्षक जितके दिवस गैरहजर राहिले त्या दिवसाचा दंड आकारून त्यांना दंडही करण्यात आहे, असे एमएमआरडीएने त्यांच्या अहवालात म्हटलंय.

दरम्यान, या प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात रमेश अय्यर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शिवसेना आमदार प्रताप सरणाईक यांची चौकशी ईडीकडून केली. तसेच अमित चंडोले यांना अटक झाली.