“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्यपुर्व फेरीत !!

पुणे : “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमी आणि स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत वेदांत कडू याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमीने पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६० धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमीने १२९ धावा धावफलकावर लावल्या. चंद्रास भालघरे (२९ धावा), भूषण पाटील (२६ धावा) आणि खुश पाटील (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ६९ धावांवर गडगडला. वेदांत कडू याने ६ धावात ४ गडी बाद करून पुणे अ‍ॅकॅडमीची फलंदाजीची फळी कापून काढली व संघाला सहज विजय मिळवून दिला.

शुभम कांबळे याच्या ६१ धावांच्या जोरावर स्पार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ब्रिलीयंट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४ गडी राखून पराभव केला. सुमित पवार (३७ धावा), गणेश बाड (३० धावा) आणि धनंजय पावडे (२५ धावा) यांच्या धावांच्या जोरावर ब्रिलीयंट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १४३ धावांचे आव्हान उभे केले. स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे आव्हान १९.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. शुभम कांबळे याने ५३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. निशांत शेवाळे याने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
२२ यार्ड्स अ‍ॅकॅडमीः १७.५ षटकात १० गडी बाद १२९ धावा (चंद्रास भालघरे २९, भूषण पाटील २६, खुश पाटील २१,
सिद्धेश जावळेकर ३-२०, सुदर्शन रणखंबे ३-२१, समर्थ देशमुख ३-३२) वि.वि. पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १७.३ षटकात १० गडी
बाद ६९ धावा (सिद्धेश जावळेकर १५, स्वयम यादव १४, वेदांत कडू ४-६, आरूष पिव्हाल १-९); सामनावीरः वेदांत कडू;

ब्रिलीयंट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १४३ धावा (सुमित पवार ३७, गणेश बाड ३०, धनंजय पावडे २५,
आर्य मुरकूटे २-१६, विग्नेश काळे २-२५) पराभूत वि. स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.२ षटकात ६ गडी बाद १४४ धावा
(शुभम कांबळे ६१ (५३, ७ चौकार, २ षटकार), निशांत शेवाळे नाबाद ३६, राहूल वाजंत्री ३-३१, अनुराग शेळके २-२२);
सामनावीरः शुभम कांबळे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलिसांना मिळाला ताबा

Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेट प्रकरण : ससून आणि कारागृह प्रशासन आले ताळ्यावर, कैदी रुग्णांचे प्रमाण अचानक झाले कमी