Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेट प्रकरण : ससून आणि कारागृह प्रशासन आले ताळ्यावर, कैदी रुग्णांचे प्रमाण अचानक झाले कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेटमुळे देशभरात चर्चेत आलेले ससून रुग्णालय (Sassoon Hospital Drugs Case) हे जणू काही कैदी रूग्णांसाठी आरामाचे ठिकाण झाले होते. त्यातच ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलचे तर येथे पंचतारांकित हॉटेलसारखे लाड पुरवले जात होते. हे सर्व प्रकार उघड झाल्याने आता प्रशासन ताळ्यावर आले आहे. ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) रूग्णालयात असताना येथे १६ कैदी रूग्ण वास्तव्य करत होते, यात माजी आमदार अनिल भोसले (Former MLA Anil Bhosale) यांचाही समावेश होता. यानंतर सर्वांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सध्या येथे केवळ एकच रूग्ण आहे. (Pune Drug Case)

सध्या कैदी रुग्णांना तातडीने येरवडा कारागृहात (Yerwada Jail) पाठविण्यात येत आहे. या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना उपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. ललित पाटील प्रकरण उघड झाल्यानंतर कैदी रुग्ण समितीने तातडीने बैठक घेत सर्व कैदी रुग्णांच्या उपचारांचा आढावा घेतला. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह १२ कैद्यांना लगेचच कारागृहात पुन्हा पाठविण्यात आले. आता ससूनमधील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

ससूनमध्ये महिन्याला सरासरी १५ कैदी रुग्ण येरवडा कारागृहातून उपचारासाठी येत असतात.
या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील एक कैदी ११ ऑक्टोबरला दाखल झाला.
त्याची मानसिक तपासणी करावयाची होती. त्याला २५ ऑक्टोबरला पुन्हा पाठविण्यात आले. तसेच एक महिला कैदी २१ ऑक्टोबरला दाखल झाली. तिचा गर्भपात करायचा होता. तो झाल्यानंतर तिला २६ ऑक्टोबरला कारागृहात पाठविण्यात आले. (Pune Drug Case)

पितळ उघडे पडल्याने येरवडा कारागृहातून सूसनमध्ये कैदी पाठविण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले आहे.
तसेच कैदी दाखल करून घेण्याचे प्रमाणही ससून प्रशासनाने कमी केल्याचे दिसत आहे.

ललित पाटीलवर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dean Dr. Sanjeev Thakur) उपचार करत होते हे तपासात उघड झाले आहे.
त्याच्या आधी क्षयरोग आणि नंतर हर्नियाचे उपचार सुरू होते. नंतर ठाकूर यांनी ललितची लठ्ठपणाची शस्त्रक्रिया
करण्याचे ठरवले आणि तसे पत्र वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले होते.
हे पत्र आता तपासात समोर आल्याने अधिष्ठात्यांनीच ललितचा रुग्णालयातील मुक्काम वाढवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आमदार, खासदारांना आवाहन, राजीनामे नको, मुंबईतच थांबा, सांगितली ‘ही’ नवी रणनिती

Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

Praneti Lavange Khardekar | प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती