Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलिसांना मिळाला ताबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) याला साकिनाका पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) अंधेरी कोर्टात ललित पाटील याचा ताबा मिळावा यासाठी सोमवारी (दि.30) प्रोडक्शन वॉरंट दाखल केले होते. अंधेरी कोर्टाने पुणे पोलिसांना ही परवानगी दिली आहे. पुणे पोलिसांना ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा मिळाला आहे. कायदेशीर प्रक्रिया करुन पुणे पोलिसांनी ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) याला आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) ताब्यात घेतले आहे.

पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. त्याशिवाय ससूनचा देखील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. परंतु हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणे गरजेचं होते. पाटील याला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सर्व माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते.

पाटीलचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

दरम्यान, ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) याने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती.
पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे, असं त्याने कोर्टात सांगितलं.
तरी देखील कोर्टाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.

ललित पाटीलचा खुलासा

ललित पाटील याला साकिनाका पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी देखील त्याने मोठा खुलासा केला होता.
मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असे त्याने म्हटले होते.
त्याच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस, येरवडा कारागृह प्रशासन
(Yerwada Jail Administration) आणि ससून व्यवस्थापन यांच्यावर संशयाची सुई वळली होती.
मात्र या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आमदार, खासदारांना आवाहन, राजीनामे नको, मुंबईतच थांबा, सांगितली ‘ही’ नवी रणनिती

Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

Praneti Lavange Khardekar | प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती