“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा विजयाचा डबल धमाका !!

पुणे : “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी आणि सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ओंकार मोगल याच्या अचूक गोलंदजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ९२ धावांवर गडगडला. ओंकार मोगल याने २३ धावात ४ गडी बाद करून श्री समर्थ संघाच्या डावाला खिंडार पाडले. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने ११.२ षटकात व केवळ २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. युसूफ मेमन याने ५० धावांची तर, आदित्य पाटील याने २४ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

पार्थ देवकर याच्या अष्टपैलू खेळीच्या मदतीने सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ९१ धावांवर आटोपला. पृथ्वीराज मिसाळ याने ३८ धावांची खेळी केली. सेंच्युरी संघाच्या पार्थ देवकर याने ७ धावात २ गडी टिपले. गौरव खैरे (२-११) आणि मेरवान यादव (२-१७) यांनी सुध्दा अचूक गोलंदाजी केली. सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १०.४ षटकात आवश्यक धावा करत विजय मिळवला. समीर कोरटकर याने ३४ धावा तर, पार्थ देवकर याने २९ धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद ९२ धावा (चंद्रहास कुलकर्णी १३, ओम पाटील १३, ओंकार मोगल ४-२३,
विवेक पाटील २-१९) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः ११.२ षटकात २ गडी बाद ९४ धावा (युसूफ मेमन ५०
(४१, ७ चौकार, १ षटकार), आदित्य पाटील २४, चंद्रहास कुलकर्णी १-१०); सामनावीरः ओंकार मोगल;

पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १७.२ षटकात १० गडी बाद ९१ धावा (पृथ्वीराज मिसाळ ३८, सुदर्शन रणखंबे ११, पार्थ देवकर २-७,
गौरव खैरे २-११, मेरवान यादव २-१७) पराभूत वि. सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १०.४ षटकात ३ गडी बाद ९५ धावा
(समीर कोरटकर ३४, पार्थ देवकर २९, सिद्धेश जवळकर १-१६); सामनावीरः पार्थ देवकर;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil – Pune News | विद्यार्थ्यांनी पर्यटन नकाशाचा अभ्यास करून महाराष्ट्र समजून घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

Female Police Suspended In Pune | पुणे: महिला पोलीस शिपायाचे तडकाफडकी निलंबन

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा संताप, सरकार आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ न शकल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढतेय…