NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा संताप, सरकार आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ न शकल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढतेय…

मुंबई : NCP MP Supriya Sule | राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाजातील बांधव एकवटले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार (State Government) केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे विविध आंदोलनांची तीव्रता वाढू लागली असून वातावरण बिघडू लागले आहे. वैफल्यग्रस्त झालेले तरूण आत्महत्येसारखे शवटचे पाऊल उचलत आहेत. या सर्व गंभीर परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी भाजपाला (BJP) फटकारले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे उद्योग केले. केंद्र आणि राज्यात पुर्ण बहुमतातील सरकार असूनही आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही. याची परिणती आता व्यापक नैराश्येत होत आहे.

https://x.com/supriya_sule/status/1716342299196825726?s=20

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले आहे की, मराठवाड्यातील तीन मराठा तरुणांनी तर जत तालुक्यात धनगर समाजातील एका तरुणाने या पंधरवड्यात याच नैराश्यातून आत्महत्या केल्या. एकीकडे भाजपाने शासकीय नोकरभरतीचा खेळखंडोबा करून ठेवला. शासकीय नोकऱ्यांच्या संधी कमी केल्या. तर दुसरीकडे आरक्षणाच्या बाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला आहे.

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले की, भाजपाचे नेते महाराष्ट्रात एक आणि केंद्रात भलतीच भूमिका घेतात. यांच्या आरक्षणाच्या कोणत्याही भूमिकेत एकवाक्यता नाही. परिणामी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आदी सर्व समुदायांचे आरक्षणाचे विषय अडकून पडले आहेत. या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने संसदेत वारंवार भूमिका मांडली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, मागे काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथील
आरक्षणाच्या प्रश्नावर तेथील भाजपाच्या खासदारांनी केंद्रात पाठपुरावा करुन, सरकारवर दबाव आणून याबाबत
लोकसभेत विधेयक आणून ते मंजूर करुन घेतले. पण महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांना हे जमले नाही कारण
त्यांच्या भूमिका दुटप्पी आहेत.

यात सुप्रिया सुळे यांनी शेवटी म्हटले आहे की, आम्ही वारंवार या सर्व आरक्षणाच्या बाबतीत एक विधेयक आणून ते
मंजूर करुन घ्या अशी मागणी करीत आहोत पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आजही शासनाने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि वरील सर्व समाजांना आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडावे, आम्ही त्याचे समर्थन करु.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parag Desai Passed Away | ‘वाघ बकरी चहा’चे पराग देसाई यांचे निधन, भटक्या कुत्र्यांचा हल्ला अखेर जीवावर बेतला

Pune PMPML News | पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली; एस. जी. कोलते नवे पीएमपीएमएलचे अध्यक्ष