Non Veg Products | जे तुम्ही शाकाहार समजून खात आहात, तो मांसाहार तर नाही ना? श्रावणात रहा सावधान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही फूड आयटम्स असे असतात जे आपण शाकाहारी समजतो, परंतु ते पूर्णपणे शाकाहारी (Non Veg Products) नसतात. या वस्तूंमध्ये काही मात्रेत अ‍ॅनिमल प्रॉडक्ट मिसळलेले असतात. हे खरेदी करताना त्यांच्या लेबलकडे आपण पहात नाही. हे नॉनव्हेज प्रोडक्ट्स (Non Veg Products) चा पर्याय म्हणून बाजारात मिळतात. श्रावण महिन्यात अशा अनेक वस्तूंचा वापर उपवासात सुद्धा होतो, अशावेळी जास्त काळजी घेतली पाहिजे. जे प्रॉडक्ट पूर्णपणे शुद्ध शाकाहारी नाहीत (not completely vegetarian) आणि त्यांच्यात काहीतरी मिसळलेले असते त्यांची माहिती घेवूयात…

1. चीज / cheese –
काही प्रकारच्या चीजमध्ये रेन्नेट मिसळलेले असते. हे विशेष प्रकारचे एंजाइम आहे जे वासरांच्या पोटातून काढले जाते. याचा वापर चीज घट्ट करण्यासाठी केला जातो.

2. ओमेगा -3 वाले प्रॉडक्ट्स / Omega-3 Products –
काही वस्तूंमध्ये नॅचरल ओमेगा-3 नसते पण त्या ओमेगा-3 युक्त बनवून विकल्या जातात. अशा वस्तू शाकाहारी नसतात आणि यामध्ये माशांकडून मिळालेले प्रॉडक्ट मिसळले जातात. शाकाहारी ओमेगा-3 साठी आळशी, चिया सीड्स आणि आक्रोड सेवन करा.

3. सॉफ्ट ड्रिंक्स / Soft Drinks –
काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये थोड्या मात्रेत जिलेटिन मिसळले जाते. हे जिलेटिन जनावरांच्या अवयवातून मिळवले जाते. सर्वच सॉफ्ट ड्रिंक्समध्ये हे नसते.

4. सफेद साखर / White sugar –
अनेक ठिकाणी रिफाईंड व्हाईट शुगर ’बोन चार’ किंवा नॅचरल कार्बन पद्धतीने ब्लीच केले जाते. या प्रक्रियेत जनावरांच्या हड्डीचा वापर होतो.

5. व्हॅनिला आइस्क्रीम / Vanilla Ice Cream –
आइस्क्रीमच्या व्हॅनिला फ्लेवरसाठी अनेक प्रॉडक्टमध्ये ऊद या प्राण्याच्या बॉडी पार्टपासून मिळालेल्या काही तत्वांचा वापर केला जातो. यास कॅस्टोरम म्हणतात. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही आणि यास प्रॉडक्टच्या साहित्य यादीत सहभागी करण्याची अवश्यकता नाही.

6. नॉन ऑर्गेनिक केळी / Non Organic Bananas –
सायन्स डेलीच्या एका रिपोर्टनुसार, नॉन ऑर्गेनिक केळीत झींगा आणि खेकड्याचा वापर केला जातो. झींगा आणि खेकड्यात बॅक्टेरियाशी लढणारी अशी कंपाऊंट आढळतात जी प्रिजर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जातात.

7. खारे शेंगदाणे / Salted Peanuts –
काही ब्रँडच्या खारे शेंगदाण्यात मीठ आणि मसाले मिसळण्यासाठी जिलेटिनचा वापर होतो. जिलेटिन काही जनावरांची हाडे आणि ऊतीमधून प्राप्त होते.

8. बारबेक्यू बटाटा चिप्स / Barbecue Potato Chips –
बाजारातील क्रिस्पी बारबेक्यू बटाटा चिप्स पूर्णपणे शाकाहारी समजून खरेदी करत असाल तर सावध व्हा. यामध्ये चिकन फॅट मिसळलेले असते. सर्वच चिप्स असे नसतात, यासाठी लेबल पाहून घ्या.

9. व्हेजिटेबल सूप / Vegetable soup –
बाजारात मिळणार्‍या बहुतांश व्हेजिटेबल सूपमध्ये चिंकन किंवा बीफच्या हाडांपासून बनवलेल्या पदार्थाचा वापर केला जातो. यासाठी लेबन पाहून घ्या.

10. हार्ड-कोटेड कँडीज / Hard-Coated Candies –
बहुतांश कँडीजमध्ये शेलॅकचा वापर होतो, जे एका मादी किड्यापासून निघणार्‍या स्त्रावापासून बनवले जाते.
सामान्यपणे याच्या साहित्यात ’कन्फेक्शनर ग्लेज लिहिलेले असते.
शेलॅकचा वापर फर्नीचर पॉलिश, हेयरस्प्रे आणि कृषी खतात सुद्धा केला जातो.

Web Titel :- Non Veg Products | vegetarian foods that surprisingly are not vegetarian

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा