Rajinikanth Jailer Movie Trailer | रजनीकांत यांचे जबरदस्त ॲक्शन सीनसह जेलर चित्रपटाचा ट्रेलर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Rajinikanth Jailer Movie Trailer | सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा आहे. यामध्ये आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) हे पुन्हा एकदा पडद्यावर ॲक्शन सीन करताना दिसणार आहे. यामुळे सर्वत्र त्यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटाची (Jailer Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काल (दि.02) रात्री उशीरा सोशल मीडियावर ‘जेलर’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर (Jailer Hindi Trailer Release) रिलीज करण्यात आला. चित्रपटात थलायवा रजनीकांत हे सुरुवातील सभ्य गृहस्थ आणि नंतर खतरनाक ॲक्शन सीन (Rajinikanth Action Scene) करताना दाखवण्यात आले (Rajinikanth Jailer Movie Trailer) आहे. रजनीकांत हे अनेक वर्षांनंतर पडद्यावर फायटिंग करताना झळकणार असल्यामुळे चाहते उत्सुक झाले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘रजनी द जेलर’ (Rajni the Jailer) या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे. चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरला लाखो व्ह्युज एका रात्रीमध्ये मिळाले आहे. हा चित्रपट एक ॲक्शन सिनेमा असल्याने थलायवा पुन्हा प्रेक्षकांना फायटिंग करताना व हत्यार चालवताना दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये सुरुवातील रजनीकांत बुट पॉलिश करताना, भाजी आणताना दाखवण्यात आले आहे मात्र नंतर त्याचे रुप पूर्णपणे बदलते ते पाहून प्रेक्षक देखील अवाक झाले आहेत. ते एक पोलीस ऑफिसरची भूमिका (Rajinikanth Look In Jailer) बजावत आहेत. गॅगस्टर सोबत त्यांची ही फायटिंग दाखवण्यात आली असून त्यांचे डायलॉग चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करत आहेत. यामध्ये बॉलीवुड अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) देखील हटके अंदाज मध्ये दाखवण्यात आले आहे.

‘रजनी द जेलर’ या चित्रपटाची कहानी (Jailer Movie Storyline) ही गॅगस्टर विरुद्ध जेलर अशी दाखवण्यात आली आहे. खतरनाक गुंडांची टोळी दाखवण्यात आली असून त्याचा मोरक्या हा जेलमध्ये अडकलेला आहे. त्या जेलचा जेलर हे थलायवा रजनीकांत आहे. या टोळीला त्यांच्या लीडरला जेल मधून सोडवायचे आहे परंतू मुथुवेल अर्थात रजनीकांत हे त्यांच्यामध्ये पहाडासारखे उभे आहेत. एका बाजूला पोलीस अधिकारी तर दुसरीकडे गुंडांची टोळी असा लढा दाखवण्यात आला आहे. यामध्ये हायटेक ड्रामा आणि जबरदस्त फायटिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये जॅकी दादा देखील गुंडाची भूमिका बजावत आहे. ते लाल रंगाचा मोठा गंद आणि भारदस्त आवाजामध्ये चित्रपटाची आणखी रंगत वाढवत आहेत.

‘रजनी द जेलर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रजनीकांत बरोबरच तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), शिव राजकुमार (Shiva Rajkumar), सुनील (Sunil) आणि योगी बाबू (Yogi Babu) हे प्रमुख कलाकार भूमिका साकारणार आहेत.
अभिनेत्री रम्या कृष्णन (Ramya Krishnan) रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारली आहे.
चित्रपटातील कावाला हे गाणे (Kaavaalaa Song) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.
‘रजनी द जेलर’ या चित्रपटाच्या ट्रेलरने (Jailer Trailer Out) प्रेक्षकांना चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे.
येत्या 10 ऑगस्ट रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीस (Jailer Release Date) य़ेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gadar 2 | गदर 2 चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग एका आठवड्यापर्यंत झाले हाऊसफुल; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद