‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही दिसली आगीशी खेळताना, ‘अशी’ शिकली खतरनाक ‘फायर डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक सुपरहिट सिनेमात डान्स नंबर दिल्यानंतर आता अभिनेत्री नोरा फतेही लवकरच स्ट्रीट डान्सर या सिनेमात दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोरा फतेहीचं बाटला हाऊसमधील नवीन गाणं ओ साकी साकी रे चर्चेत आहे. ओ साकी साकी रे या गाण्यात नोराने फायर डान्स केल्याचेही दिसत आहे. फायर डान्स स्टेप खूपच खतरनाक आहेत. याची प्रॅक्टीस कशी केली हे नोराने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. फायर डान्स शिकतानाचा हा नोराचा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना नोराने लिहिले आहे की, “हा व्हिडीओ ओ साकी साकी रे गाण्याच्या एक दिवस आधीचा आहे. माझ्याकडे फायर डान्स शिकण्यासाठी केवळ २ दिवस होते. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, फायर डान्स शिकण्याआधी मला किती भीती वाटत होती. माझ्या चेहऱ्यावरही ते स्पष्ट दिसत आहे. खूप कमी वेळात मी ही टेक्निक शिकले. मी माझी शिकण्याची क्षमता कायम ठेवली आणि भीतीला मागे ठेवले. त्यामुळे मी नवीन गोष्ट शिकले. हे आर्ट शिकण्याचे धैर्य माझ्यात नव्हते परंतु मला शिकवणाऱ्या आर्टीस्टमुळे हे शक्य झाले. मी कधीच म्हणत नाही की, हे नाही होऊ शकत. मी नेहमीच म्हणते की, मी करू शकते. मला संधी देण्यासाठी टीमचे धन्यवाद.”

बाटला हाऊस या सिनेमात जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहे. टी सीरीजचे भूषण कुमार, निखिल आडवाणी आणि जॉन अब्राहम मिळून हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. मागील वर्षी सिनेमातील जॉनचा लुक रिलीज करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –