Nora Fatehi | “बॉलीवुडमध्ये सध्या फक्त चारच अभिनेत्रींना काम मिळत आहे, त्यांना थांबवून मी…” नोरा फतेहीने व्यक्त केली खंत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची डान्सिंग डीवा अशी ओळख मिळवणारी नोरा फतेही (Nora Fatehi) ही एक प्रसिद्ध बॉलीवुड सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या साकी साकी (Saki Saki Song), दिलबर (Dilbar Song), गर्मी (Grami Song) यांसारख्या आयटम सॉन्गने अक्षरशः आग लावली (Nora Fatehi Item Song) आहे. नोराने तिच्या कातील डान्स मुव्हजने चाहत्यांना घायाळ केले आहे. डान्सर नोरा फतेही ही नेहमी तिच्या डान्स आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने ‘स्ट्रीट डांसर 3D’ या चित्रपटामधून (Street Dancer 3D Movie) अभिनयाची सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर नोराला फक्त डान्सर म्हणूनच ऑफर मिळू लागल्या. अभिनेत्री म्हणून तिला जास्त काम मिळाले नाही. याची खंत आता नोरा फतेहीने (Nora Fatehi) बोलून दाखवली आहे. बॉलीवुडमध्ये फक्त चारच अभिनेत्रींना निर्माते काम देत आहे (Nora Fatehi On Bollywood) असा घणाघात नोरा फतेही हिने केला आहे.

कॅनडा वरुन बॉलीवुडची अभिनेत्री होण्याचे स्वप्न उरी बाळगून नोरा फतेही ही भारतात आली. मात्र इथे आल्यानंतर तिला बॉलीवुडच्या (Bollywood News) अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. तिला डान्सर म्हणून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. मात्र तिला चित्रपटांच्या ऑफर जास्त मिळाल्या नाहीत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिचे याबदद्ल मत व्यक्त केले आहे. नोरा फतेही म्हणाली की, चित्रपट निर्माते हे एका चौकटीमधून बाहेर पडत नाही. या बॉलीवुडमध्ये फक्त चार मुलींनाच कामे मिळत आहे. मला असे वाटत नाही की मी फक्त डान्स करते म्हणून ते मला कास्ट करत नाहीत. अशा अनेक बॉलीवुड दिग्गज अभिनेत्री आहेत ज्या उत्तम डान्स करतात. त्याच्या नृत्याला तोड नाही. चांगली अभिनेत्री म्हणून डान्स करता येणे हे पॅकेजमध्ये असावे लागतेच. निर्माते हे बघत असतात कदाचित माझ्यापेक्षा कोण चांगला अभिनय करू शकते किंवा संवाद चांगले बोलू शकते हे पाहिले जाते. ज्यांना भाषा चांगली बोलता येते असे लोक पाहिले जातात. प्रत्येकजण संधी मिळताच त्यावर तुटून पडतात.

डान्सर नोरा (Nora Fatehi) पुढे म्हणाली की, आताच्या युगात बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्पर्धा वाढली आहे. एका वर्षांत काहीच चित्रपट निर्मित झाले आहेत आणि चित्रपट निर्माते त्यांच्या चौकटीच्या बाहेर येऊन पाहतच नाहीये की त्यांच्या आजूबाजूला नक्की काय आहे. फक्त चार मुलींना कामे मिळत आहेत. चित्रपट मिळत आहेत. ते या चौघींना सोडून बाकी कोणाचाच विचार करत नाहीये. तर हे आपले काम आहे की, त्या चार जणींना थांबवा आणि तुम्ही पाचवे बना. आणि सोबतच रोटेशनमध्ये देखील समाविष्ट झाले पाहिजे. हे काम अवघड आहे पण असे होत आहे. या साठी मी खूप आभारी आहे. आता माझ्यापुढे फक्त हेच आव्हान आहे की मला स्वतःला सिद्ध करावे लागले, ज्यामुळे मी इथे दीर्घकाळ टिकेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल