Nora Fatehi | “प्रसिद्ध अभिनेत्याला डेट कर…” नोरा फतेहीला प्रसिद्धीसाठी बॉलीवुड पीआरने सुचवला ‘हा’ पर्याय

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची डान्सिंग डीवा अशी ओळख निर्माण करणारी डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही नेहमी चर्चेत असते. नोरा अनेकदा तिच्या जबरदस्त डान्समुळे व वक्तव्यांमुळे लाईमलाईटमध्ये राहते. नोरा ही कॅनेडावरुन बॉलीवुडमध्ये (Bollywood News) करिअर करण्यासाठी आली होती. मात्र सुरुवातीच्या काळात नोरा फतेही (Nora Fatehi) हिला खूप स्ट्रगल करावे लागले. अनेकदा ती तिचे या काळातील कटू अनुभव शेअर करत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड पीआर (Bollywood PR) हे तिला सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर कर असे सुचवत असल्याचे नोराने सांगतले आहे.

डान्सर नोरा फतेही हिने तिच्या डान्सिंग स्किलच्या (Nora Fatehi Dance Moves) बळावर बॉलीवुडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आज नोरा प्रसिद्ध बॉलीवुड सेलिब्रिटीमध्ये गणली जाते. तिचे ‘सत्यमेव जयते’ (Satyameva Jayate) या चित्रपटातील साकी साकी हे गाणे (Saki Saki Song) प्रचंड गाजले आणि ती स्टार बनली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नोराने सांगितले की, “मला सतत सांगण्यात येत होते की पीआरसाठी तरी तुम्ही लोकांना डेट करा, ठराविक लोकांना आणि प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट (Nora Fatehi Affair) करा.

पण मी त्यांचे कधीच ऐकले नाही आणि मी हे चांगले केले की मी त्यांचे ऐकले नाही. मी माझ्यासाठी काही नियम बनवले आणि त्यानुसार मी काम केले. यशाचा अर्थ असा नाही की दुसरी व्यक्ती माझ्यासोबत आहे किंवा दुसरा अभिनेता माझ्यासोबत आहे.” अशा पद्धतीने नोरा बॉलीवुडच्या या इंडस्ट्री न पाहिलेली बाजू पुन्हा एकदा समोर आणली आहे. बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अफेअर करण्याचा पर्याय पीआर सुचवतात हे नोराने उघडपणे सांगितले आहे. तसेच नोराने मुलाखतीमध्ये सांगितले आहे की तिचा कॉनमैन सुकेश केससोबत (Conman Sukesh Case) काहीही संबंध नाही. तिला उगाचच या केसमध्ये ओढले जात आहे.

डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही आता बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती बनली आहे.
नोराचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
नोरा फतेही हिने अनेक चित्रपटातील गाणी तिच्या डान्समुळे सुपरहिट केली आहेत. तिने अल्बम सॉग्ज् देखील केले आहेत.
सध्या ती छोट्या पडद्यावरील ‘हिप हॉप इंडिया’ डान्सिंग शो ची (Hip Hop India Dancing Show) जज म्हणून काम
करत आहे. तसेच लवकरच नोरा दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज (Superstar Varun Tej) सोबत चित्रपटामध्ये
भूमिका देखील साकारणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sonalee Kulkarni | सोनालीचे होते ‘हे’ सेलिब्रिटी क्रश; फक्त नावं सारखं म्हणून गेली डेटवर