Note Exchange | 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात बँक देते इतके रुपये, जाणून घ्या कुठे आणि कशी बदलावी नोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Note Exchange | खराब आणि फाटलेल्या नोटा बदलण्याच्या नियमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अनक महत्वाचे बदल केले आहेत. नियमानुसार, नोटेच्या स्थितीच्या आधारवर देशभरात लोक आरबीआय कार्यालये (RBI)आणि बँकांच्या शाखेत विकृत किंवा दोष असलेल्या नोटा बदलू शकता. कुठे आणि कशाप्रकारे अशा नोटा (Note Exchange) बदलाव्यात, याबाबत जाणून घेवूयात…

येथे बदला फाटलेल्या नोटा

तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलू शकता. बँकेचे कर्मचारी यासाठी नकार देऊ शकत नाहीत. आरबीआयने सर्व बँकांना तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तसेच शाखांमध्ये बोर्ड लावण्यास सांगितले आहे.

2000 च्या फाटक्या नोटेच्या बदल्यात मिळतात इतके रु.

आरबीआयनुसार, 2000 रुपयांच्या नोटेच्या 88 चौ. सेंटीमीटर भाग असल्यास संपूर्ण पैसे मिळतील. तर 44 वर्ग सीएमवर अर्धेच पैसे मिळतील.

बँका घेत नाहीत शुल्क

फाटलेल्या नोटा घेण्यासाठी बँका कोणतेही शुल्क घेत नाहीत.
मात्र, अतिशय खराब असलेल्या किंवा जळलेल्या नोटा घेण्यास नकार दिला जाऊ शकतो.
नोट जाणीवपूर्वक फाडल्याचा संशय आल्यास बँक ती बदलून देणार नाही.

किती मिळेल रिफंड?

50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या जुन्या फाटलेल्या नोटेच्या परताव्यासाठी आवश्यक आहे की नोट 2 भागात विभागली असेल ज्यामध्ये एक भाग पूर्ण नोटेच्या 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र कव्हर करत असेल.

 

Web Title : Note Exchange | bank give in exchange if the 2000 rs damaged notes how and where you can exchange

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

Crime News | पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित