पुरुषांच्या ‘त्या’ शस्त्रक्रियेऐवजी आता गर्भनिरोधक इंजेक्शन

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – पूर्वी कुटुंब नियाेजन करण्यासाठी पुरुषांची नसबंदी केली जायची. आता भारतीय संशोधकांनी यावर पर्याय शोधला आहे. त्यामळे आता पुरुषांना नसबंदीची गरज भासणार नाही. भारतीय संशोधकांनी एक लसीचा शोध लावला आहे. ही लस म्हणजे गर्भनिरोधक लस आहे. मुख्य म्हणजे या लसीचा परिणाम तब्बल 13 वर्षे राहतो. यामुळे आता नसबंदीची गरज पडणार नाही.

यासाठी लागणारी वैद्यकीय चाचणीही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या देखरेखीखाली पूर्ण झाली असून आरोग्य मंत्रालयाला त्याचा अहवालही सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध होणार आहे. याचा प्रयोग सर्वप्रथम उंदीर, ससे, व अन्य प्राण्यांवर केला गेला. त्यांच्यावर प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच मानवावर याचा प्रयोग करण्यात आला. जो 99.2 टक्के यशस्वी झाला आहे.

याबाबत बोलताना  डॉ.आर. एस. शर्मा म्हणाले की, “आतापर्यंत कुटुंब नियोजनासाठी पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करावी लागत होती; पण आता या इंजेक्शनमुळे नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. याची विशेष खासियत म्हणजे या इंजेक्शनचा परिणाम 13 वर्षे राहतो.

“खरगपूरच्या आयआयटीचे शास्त्रज्ञ एस. के. गुहा यांनी या इंजेक्शनचा शोध लावला असल्याची माहिती समोर आली आहे. या इंजेक्शनमध्ये 60 एमएलचा एक डोस असून हे एक प्रकारचे  सिंथेटिक पॉलिमर आहे.