हैदराबाद महापालिका निवडणूक 2020 : आता केवळ Donald Trump यायचे बाकी आहेत, भाजपचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रचारात लक्ष घातल्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे. सध्या महापालिका निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण तापल आहे. या निवडणुक प्रचारासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला. भाजपने या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावले आहे की, आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे बाकी राहिले आहेत, असा टोला एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी ( MIM chief MP Asaduddin Owaisi) यांनी लगावला आहे.

लांगर हाऊस येथे झालेल्या रॅलीमध्ये शनिवारी ओवेसी म्हणाले की, ही महापालिका निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही आहे. असे वाटतेय की नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत आहे. इथे त्यांनी सर्वांना बोलावले आहे, आता केवळ डोनाल्ड ट्रम्पच उरले आहेत. यापूर्वीही ओवेसींनी भाजपावर टीका केली होती. 1 डिसेंबर रोजी जनता डेमोक्रॅटिक स्ट्राइक करेल, असा टोला लगावला होता.

शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. तसेच संध्याकाळी एका सभेला संबोधित केले होते. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये रोड शो केला होता. या अभियानादरम्यान, आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे आश्वासन येथील जनतेला दिले. यावरुनही ओवेसी यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

हैदराबादला फुटरतावादी शक्तीपासून वाचवा- के. चंद्रशेखर राव
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीका केली होती. काही फुटीरतावादी शक्ती शांतता भंग करण्यासाठी शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना असे करू देणार का, आपण आपली शांतता भंग गमावणार आहोत का, मी हैदराबादच्या जनतेला आवाहन करतो की, तुम्ही पुढे या आणि टीआरएसला पाठिंबा द्या. हैदराबादला या फुटीरतावादी शक्तींपासून वाचवा, असे आवाहन, चंद्रशेखर राव यांनी केले होते.