रॉबर्ट वाड्रा EDच्या रडारवर, चौकशीसाठी मागितली कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती ईडीने दिल्ली हाय कोर्टाकडे केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरित्या थेट संबंध असून मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याची तक्रार ईडीनं कोर्टात केली आहे . या प्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये 12 ब्रायनस्टन स्क्वेअरस्थित 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदीमध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं वाड्रा यांना अंतरिम जामीन दिला होता. या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. वाड्रा यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती ईडीने कोर्टाकडे मागितली आहे. तसेच वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणी हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली.

वाड्रा यांच्या वकिलांनी ईडीनं केलेल्या या आरोपांचा इन्कार केला आहे. दरम्यान, दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी हायकोर्टानं अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?
रॉबर्ट वाड्रांकडून लंडनमध्ये खरेदी करण्यात आलेली संपत्ती मनी लाँड्रिंगमधील पैशातून खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल मालक असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. व्हर्चुअल मालक हा एखाद्या संपत्तीचा अप्रत्यक्ष मालक असतो. कागदोपत्री हा मालक जरी नसला तरी त्याचा हक्क असल्याचे भासवतो.

Visit : policenama.com