JEE Main 2021 Exam : मार्च सत्रासाठी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, ‘इथं’ पहा नवीन शेड्यूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन्स मार्च सत्र 2021 च्या तारखेत बदल केला आहे. अगोदर ही परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार होती. एनटीएनुसार, आता जेईई मेन 16 ते 18 मार्चपर्यंत देश आणि परदेशात 331 शहरांमध्ये विविध केंद्रांवर आयोजित केली जाईल.

मागील आठवड्यात, एनटीएने मार्च सत्रासाठी जेईई मेन 2021 चे अ‍ॅडमिट कार्ड अगोदरच जारी केले आहेत. अ‍ॅडमिट कार्डचा वापर करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर आपला अर्ज क्रमांक आणि जन्म तारीखेत लॉग इन करून आपले अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करायचे आहे.

जेईई मेन 2021 मार्च सत्राची परीक्षा पहिल्या चार दिवसांसाठी आयोजित होणार होती. आता केवळ तीन दिवसांसाठी आयोजित केली जाईल. एनटीएने हे सुद्धा म्हटले की, ही विविध केंद्रांवर कम्प्यूटर अधारित टेस्ट (सीबीटी) मोडमध्ये आयोजित केली जाईल.

जेईई मेन 2021 : मार्च सत्रासाठी अ‍ॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल.
1) अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
2) होमपेजवरील अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
3) आपली लॉगिन माहिती नोंदवा. अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सबमिट करा.

उमेदवारांना जेईई मेन अ‍ॅडमिट कार्डवर स्व-घोषणा पत्र द्यायचे असते, जिथे उमेदवारांना त्यांच्या आरोग्याची स्थिती आणि अलिकडे केलेल्या प्रवासाची महिती द्यावी लागेल. कोविड-19 मानदंड लक्षात घेता, उमेदवारांना फेस मास्क घालणे आवश्यक आहे. याशिवाय, एनटीए परीक्षा केंद्रांवर 3-प्लाय फेस मास्क दिला जाईल जो उमेदवारांना घालायचा आहे.