EPFO मेंबर्सला ‘एकदम’ फ्री मिळतो 6 लाख रुपयांचा विमा, जाणून घ्या तुम्हाला मिळाला की नाही

नवी दिल्ली : ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांना आणि कर्मचार्‍यांना अनेक प्रकारच्या सुविधा देते. यामध्ये एक सुविधा अशी आहे जी सर्व सदस्यांना मिळते आणि कठिण काळात त्यांच्या कुटुंबियांना उपयोगी पडते. ईपीएफओचे सर्व कर्मचारी आणि सदस्यांना इन्श्युरन्स स्कीम 1976 एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (ईडीएलआय) अंतर्गत विमा कवर मिळते. ही रक्कम सदस्यांच्या वेजच्या 20 पट म्हणजे 6 लाख रुपये आहे.

एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स अंतर्गत कर्मचार्‍याला मिळणार्‍या विम्याचा दावा आजारपण, दुर्घटना किंवा नैसर्गिक मृत्यूनंतर करता येतो. परंतु, हा लाभ त्यांना मिळतो ज्यांनी मृत्युपूर्वी 12 महीन्यांच्या आत एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये नोकरी केली आहे. या स्थितीत विमाधारकाच्या कुटुंबाला एकरक्कमी पैसे मिळतात. या विम्यासाठी कर्मचार्‍याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.

कुठून मिळतो पैसा  

संघटीत क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला ईपीएफची रक्कम कापली जाते आणि तेवढीच रक्कम कंपनीसुद्धा जमा करते. सध्याच्या स्थितीत ईपीएफमध्ये कर्मचारी आपल्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम जमा करतो आणि कंपनीकडून सुद्धा 12 टक्के रक्कम जमा केली जाते. कंपनी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करते.

परंतु, याशिवाय सुद्धा कंपनीकडून काही योगदान दिले जाते. ईडीएलआई स्कीम अंतर्गत कंपनीला 0.50 टक्के, 1.1 टक्के ईपीएफ अ‍ॅडमिनिस्ट्रिेटिव्ह चार्ज आणि 0.01 टक्के ईडीएलआयएस अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह चार्ज द्यावा लागतो.

अशाप्रकारे कंपनीकडून ईडीएलआयमध्ये जमा केल्या जाणार्‍या 0.5 टक्के कॉन्ट्रीब्यूशन अंतर्गत पीपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला सहा लाख रुपयांपर्यंत इन्श्युरन्स संरक्षण मिळते. कर्मचारी भविष्य निवार्ह निधीमध्ये सहभागी सर्व कर्मचारी ईडीएलआय 1976 च्या अंतर्गत संरक्षित केले जातात.

कसा आणि कोण करू शकतो दावा

जर ईपीएफ खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनी किंवा कायदेशिर वारसदार इन्श्युरन्स संरक्षणासाठी क्लेम करू शकतो. क्लेम करणारा जर अल्पवयीन किंवा वृद्ध असेल तर त्याच्यावतीने गार्डीयन क्लेम करू शकतो. यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स द्यावे लागतात.

जर पीएफ खात्याचा कुणी नॉमिनी नसेल तर कायदेशिर वारसदार या रक्कमेसाठी क्लेम करू शकतो. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कंपनीकडे जमा होणार्‍या फॉर्मसोबत इन्श्युरन्स कव्हरचा फॉर्मसुद्धा जमा करावा. प्रथम या फॉर्मची कंपनी पडताळणी करेल आणि त्यानंतर कवरचे पैसे मिळतील.