Nysa Devgan | निसा देवगन पुन्हा बाहेर पडताना धडपडली; नेटकरी म्हणतात ‘ही निसा नाही तर नशा आहे’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड स्टार किड्सची नेहमी चर्चा रंगलेली असते. आपल्या आवडत्या अभिनेत्री व अभिनेत्यांच्या मुलांच्या लाईफ स्टाईल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या बी टाऊन मधील अनेक स्टार किड्स लाईमलाईटमध्ये आले आहेत. यामधील एक असणारी निसा देवगन (Nysa Devgan). अभिनेत्री काजोल (Kajol) व अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) यांची निसा देवगन ही अगदी कमी वयामध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. पण तिच्या कौतुकापेक्षा निसाला ट्रोल जास्त केले जाते. निसा देवगनचे अनेक फोटो आणि पार्टीमधून बाहेर येतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे किंवा तिच्या वागणूकीमुळे निसा देवगन (Nysa Devgan) ट्रोलर्सची शिकारी होते. आता पुन्हा एकदा तिचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काजोल व अजयची मुलगी निसा देवगन ही सतत चर्चेत असलेली स्टार किड आहे. अनेकदा ती परदेशामध्ये पार्टी करताना स्पॉट होते. नुकतीच ती लंडनमध्ये देखील एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी देखील पार्टी (Nysa Devgan Party Video) एन्जॉय करुन बाहेर येताना तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. निसा ही नेहमी बड्या पार्टीमधून नशा करुन बाहेर पडते अशा कमेंट तिला केल्या जातात. तिच्या कपड्यांवरुन व वागणूकीवरुन निसाला ट्रोल (Nysa Devgan Troll) केले जाते. निसा आणि काजोलचे फोटोशूट देखील खूप गाजले होते. यावेळी निसाने परिधान केलेल्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे (Nysa Devgan Revealing Dress) सोशल मीडियावर निसाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी निसाने तिचा 20 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे लहान वयामध्ये तिचे वागणे अनेकांना पटतं नसल्याचे समोर येत असते. यावेळी देखील निसा एका पार्टीमधून बाहेर येताना तिचा तोल गेला आहे. निसा देवगनची ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यावेळी निसा देवगन (Nysa Devgan) एका पार्टीमधून बाहेर येताना दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची जीन्स स्टाईल केली आहे. केस मोकळे सोडले असून हातामध्ये फोन घेऊन निसा बाहेर पडताना दिसत आहे. मात्र ती चालताना धडपडताना दिसत आहे. यावेळी तिच्या मागे असलेली व्यक्ती तिला सावरते. त्यानंतर निसा स्वतः देखील सावरते आणि गाडीमध्ये बसते. निसा देवगनचा हा व्हिडिओ व्हायरल असून नेटकऱ्यांनी यावर निगेटिव्ह कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Wanwadi Pune | वानवडीच्या सय्यदनगर परिसरात तडीपार गुंडाचा खून तर इतर दोघे गंभीर जखमी