मुलीच्या बॉयफ्रेंडला ओबामांनी आपल्या घरात ठेवले, म्हणाले – ‘खुप खात होता, खर्च वाढला…’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खुलासा केला आहे की, कोरोना महामारीमध्ये क्वारंटाइनदरम्यान त्यांच्या मुलीचा बॉयफ्रेंड, त्यांच्या घरातच राहीला होता. ओबामा यांनी हे सुद्धा सांगितले की, एका तरूण माणसाच्या जास्त खाण्यामुळे त्यांच्या ग्रोसरीचे बिल 30 टक्के वाढले होते.

The Bill Simmons Podcast शो मध्ये ओबामा यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या दिवसात मुलगी मलियाचा बॉयफ्रेंड आमच्या कुटुंबासोबतच क्वारंटाइन झाला होता. मलिया ओबामा यांची मोठी मुलगी आहे आणि तिचे वय 22 वर्ष आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव रोरी फर्कुहर्सन आहे.

ओबामा यांनी मलियाचा बॉयफ्रेंड रोरीबाबत म्हटले – वीजाबाबत अनेक गोष्टी होत्या. त्याचा जॉब होता. यासाठी आम्ही त्यास आमच्या सोबत राहू दिले. मी त्याला पसंत करणार नव्हतो, पण तो चांगला मुलगा आहे.

ओबामा यांनी हे सुद्धा सांगितले की, क्वारंटाइन दरम्यान मुली मलिया, साशा आणि रोरी यांच्यासोबत चांगले क्षण घालवले. ओबामा यांनी या सर्वांना कार्ड गेम्स खेळायला सुद्धा शिकवले.

ओबामा यांनी सांगितले की, रोरीचा डाएट त्यांच्या मुलींपेक्षा वेगळा होता. त्याला खाताना पाहणे अजब वाटत होते. यामुळे ग्रोसरी बिल 30 टक्के वाढले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, मलिया ओबामा आणि रोरी फर्कुहर्सन 2017 मध्ये हार्वर्डमध्ये शिक्षणादरम्यान भेटले होते.