Old Mumbai Pune Highway Accident | जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघात : घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख

मुंबई : Old Mumbai Pune Highway Accident | जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.

 

 

 

 

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी (Raigad Collector)
आणि पोलीस अधिक्षकांशी (Raigad Police) दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.
अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी
मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे
मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

Web Title :-  Old Mumbai Pune Highway Accident |  Private bus accident on the old Mumbai-Pune highway: 5 lakh each from the Chief Minister’s Aid Fund to the kin of the deceased

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख