OMG 2 | ओह माय गॉड 2 चित्रपटामध्ये अक्षय कुमारचा बदलला रोल; 20 कट्स सह चित्रपट होणार प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट ओह माय गॉड 2 (OMG 2) हा चित्रपट प्रर्दशनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटावर आक्षेप घेण्यात आले होते. चित्रपटाचा विषय हा सेक्स एज्युकेशन व देवावरील श्रद्धा असा असल्यामुळे बोर्डकडून सर्टिफिकेट दिले जात नव्हते. चित्रपटामध्ये 20 कट्स सह A सर्टिफिकेट (Censor Board Certificate) दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ओएमजी 2 (OMG 2) चित्रपट निर्मात्यांना हे मान्य होत नव्हते. आता मात्र चित्रपटामध्ये 20 कट्स करुन चित्रपट ठरल्याप्रमाणे येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित (OMG 2 Release Date) करण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमारची भूमिका बदलण्यात आली आहे.

अभिनेता अक्षय कुमार याने ओह माय गॉड 2 (Oh My God 2 Movie) चित्रपटामध्ये भगवान शंकराची भूमिका साकारली होती. मात्र बोर्डाने सुचविल्याप्रमाणे या पुढे तो भगवान शिव यांची नाही तर शंकरांच्या दूताची भूमिका (Akshay Kumar Role In OMG 2) साकारणार आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या लूकवर व त्याच्या भूमिकेवर नेटकरी फिदा झाले होते. आता मात्र त्याची भूमिकाच बोर्डातर्फे बदलण्यात आली आहे. तो चित्रपटामध्ये शिवभक्त म्हणून दाखवला जाणार आहे. डायलॉगमध्ये बदल झाला असून अक्षयचा डायलॉग “नंदी माझा भक्त… जी आज्ञा प्रभू” अशा पद्धतीने डायलॉग देखील (Dialogue Chnages In OMG 2) बदलण्यात आले आहे. याआधी काही बॉलीवुडच्या चित्रपटामुळे समाजामधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ओमजी 2 चित्रपटामुळे कोणात्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची बोर्डकडून दखल घेतली जात आहे.

बहुचर्चित ओह माय गॉड 2 चित्रपटामध्ये बोर्डकडून तब्बल 20 कट्स देण्यात आले आहे. यामुळे चित्रपटामध्ये अनेक बदल (Changes In OMG 2 Movie) करण्यास सांगितले आहे. अक्षय कुमारच्या भूमिकेमध्ये बदल झाला असून तो शिवभक्त दाखवण्यात येणार आहे. असेच आणखी काही बदल करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये एका सीनमध्ये भगवान शिवाचा दूत मद्यधुंद अवस्थेत दाखवण्यात आला आहे, जो त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये डायलॉग बोलतो. हा सीन व त्यातील संवाद बदलण्यात आले आहेत. तसेच चित्रपटामध्ये फ्रंटल नग्नतेची दाखवण्यात आली होती आता त्याजागी नागा साधूंची दृश्ये दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटामध्ये महिलांना मंदिर प्रवेश रोखण्यासाठी काही आपत्तीजनक वाक्ये अनाऊंसमेंट म्हणून दाखवण्यात आली होती. ती कट करण्यात आली आहेत.

चित्रपट जाणकारांच्या मते ओह माय गॉड हा चित्रपट काल्पनिक असला तरी चित्रपटाची कहानी मध्य प्रदेशच्या महाकाल उज्जैन (Mahakal Ujjain) या शिवस्थानावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपटातील ठिकाणाचे नाव हे खरे न दाखवता ते काल्पनिक ठेवण्यास बोर्डाने सांगितले आहे. जिथे शाळेचे नाव दाखवले आहे तिथे बदलून ‘सवोदय’ असे करण्यात आले आहे. भगवान शंकराला दारुचा प्रसाद चढवण्याची काही दृश्ये आहेत. त्यामध्ये वापरण्यात आलेली रम, व्हिस्की हे शब्द काढून देवाला मदीरा चढवण्यात येत आहे असे शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. चित्रपटामध्ये जिथे जिथे लिंग हा शब्द वापरण्यात आला आहे तिथे तिथे तो शिवलिंग किंवा शिव असे करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील काही डायलॉगमध्ये ‘क्या होवे है… आणि ‘आप अश्लील कह रहीं’ अशा डायलॉगमधील पौराणिक शब्द काढण्यास सांगण्यात आले आहे. आमध्ये ‘शिवजी यांचे लिंग’, ‘अश्लीलता’, ‘श्री भगवद् गीता’, ‘उपनिषद’, ‘अथर्वेद’ ‘द्रौपदी’, ‘पांडव’, ‘कृष्ण’, ‘गोपी’ ‘रास लीला’ असे संदर्भ आणि शब्द चित्रपटातील संवादांमध्ये येत आहे.

आस्था बरोबरच ओह माय गॉड 2 हा चित्रपट सेक्स एज्युकेशनवर देखील आधारित आहे.चित्रपटामध्ये सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी हे हस्तमैथुनाबद्दल सविस्तर बोलतांना दाखवण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने त्याने बोललेल्या संवादांमध्येही काही बदल केले आहेत. यामध्ये हस्तमैथुनासाठी वापरला जाणारा ‘हराम’ हा शब्द ‘पाप’ या शब्दाने बदलला आहे. NCPCR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका अल्पवयीन मुलाकडून लैंगिक कृत्य केल्याच्या दृश्यात चित्रपटात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच अनैसर्गिक सेक्सशी संबंधित मूर्ती दाखवताना सेक्स वर्करला विचारणा करण्याच्या दृश्यांमध्ये आणि संवादांमध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. भगवान शिवाच्या दूताने बोललेल्या मैं टांग क्यों अड़ाऊं…’ या संवादातही बदल करण्यात आले आहेत.

चित्रपटात भगवान शिवाचा दूत अध्यात्मात मग्न होऊन स्नान करतानाच्या दृश्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. तसेच त्या दूताने एक डायलॉग बोलला आहे – ‘बड़े बाल देखकर… रुपये मिलेंगे’. हा संवादही सेन्सॉर बोर्डाने बदलला आहे. तसेच ‘हाई कोर्ट… मजा आएगा’ हा संवाद घटनात्मक संस्थेच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने त्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोर्टातच सुनावणीदरम्यान ‘महिला की योनी… हवन कुंड है’ या डायलॉगच्या बोलण्यासोबतच अश्लील हावभावांमध्येही बदल करण्यात आला आहे. कोर्टामध्ये जज सेल्फी काढत आहे असे दाखवण्यात आले आहे ते देखील करण्यात आले आहे.‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे देखील डायलॉग मधून काढून टाकण्यात आले आहे.

अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुचर्चित ओह माय गॉड 2 (OMG 2 ) या चित्रपटामध्ये अनेक वादग्रस्त व आक्षेपार्ह डायलॉग
होते. मात्र बोर्डकडून हे सगळे बदल करण्यात आले आहे. तरी चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्यात आले आहे.
यामुळे चित्रपट फक्त 18 वर्षांवरील व्यक्तींनाच पाहता येणार आहे.
येत्या 11 ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ओह माय गॉड 2 चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय (Amit Rai) यांनी केले असून निर्मिती व्हायाकॉम इंडियाने केली आहे
‘ओएमजी 2’ (OMG) चित्रपटामध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अरुण गोविल (Arun Govil),
अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

PM Modi’s Pune Visit: Metro Rail Inauguration, Waste-to-Energy Plant, and PMAY Houses – Live Updates