OMG ! मुल रडत असल्याने त्रस्त महिलेनं उचललं भयंकर पाऊल, ओठांवर फेव्हिक्विक लावून चिकटवले तोंड

पाटणा : वृत्तसंस्था –  OMG | बिहारच्या (Bihar) छपरा जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वी एक घटना समोर आली होती. येथे एका आईने रडणार्‍या निष्पाप मुलाला (baby) शांत करण्यासाठी अतिशय वेदनादायी पद्धत अवलंबली होती. मुलाच्या रडण्याने त्रस्त झालेल्या आईने त्याच्या तोंडाला फेव्हिक्विक (Faviquic) लावले होते. या घटनेची माहिती जेव्हा मुलाच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांच्या पाया खालील वाळू सरकली. OMG woman put feviquick on baby lips and stuck her mouth after disturbed by him crying

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, काही काम केल्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना जाणवले की मुल खुपच शांत आहे.
त्यांना दिसून आले की त्याला काहीतरी बोलायचे आहे, मुलाच्या तोंडातून फेस निघत होता.
जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला याबाबत विचारले तेव्हा तिने तो सतत रडत होता, असे सांगितले.

आईने सांगितले की, या कारणामुळे तिने मुलाच्या ओठांना गोंद (Faviquic) लावला, जेणेकरून तो शांत रहावा.
वडिलांनी जेव्हा मुलाला जवळ घेऊन पाहिले तेव्हा त्यांना आढळले की त्याच्या तोंडाला काहीतरी लावलेले आहे.
सुरूवातीला त्यांना वाटले की कपडे धुण्याची पावडर आहे परंतु नंतर त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला असता ते निघाले नाही.

यानंतर त्यांनी याबाबत पत्नीला विचारले असता घटनेचा खुलासा झाला.
या घटनेनंतर मुलाला हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले.
प्रकरण पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले.
कारण प्रकरण खुपच वेगळे होते. मात्र, मुलाला जास्त धोका निर्माण झाला नव्हता, उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याचे बाहेर आली होती.

 

Web Title : OMG woman put feviquick on baby lips and stuck her mouth after disturbed by him crying

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत (व्हिडीओ)

UBI Recruitment 2021 | उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती

Assam-Mizoram Border Clash | मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरची मृत्यूशी यशस्वी झुंज’, सीमा संघर्षात लागल्या होत्या गोळ्या