अखेर सलमान खान निर्मित “लवरात्री” सिनेमाचे नाव बदलले

वृत्तसंस्था :

सलमान खान निर्मित ‘लवरात्री’ या नावावरून झालेल्या गोंधळानंतर आता या चित्रपटाचे नाव “लवरात्री” वरून “लवयात्री” करण्यात आले आहे. अभिनेता आणि या चित्रपटाचा निर्माता सलमान खानने त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंट वरून चित्रपटाच्या बदलेल्या नावाचे पोस्टर शेअर केले आहे. यावेळी त्याने “this is not spelling mistake” असे देखील म्हंटले आहे.

काही हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाच्या नावावरून बराच गोंधळ घातला होता. हे नाव म्हणजे ‘नवरात्री’ नावाशी मिळते जुळते आहे. हिंदू संस्कृतीत नवरात्री उत्सवाला खूप महत्व आहे त्यामुळे भावना दुखावलया जातात असे हिंदुत्तवादी संघटनांचे म्हणणे आहे. जेव्हापासून ‘लावरात्री ‘ असे चित्रपटाचे नामकरण करण्यात आले आहे. तेव्हापासूनच याबाबत वाद विवाद सुरु आहे. एवढेच काय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी देखील ताकीद या संघटनांकडून देण्यात आली होती. आता मात्र सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून सिनेमाचे नाव बदललेले पोस्टर शेअर केल्यामुळे अखेर चित्रपटाच्या नावावरून चाललेलया वाद विवादाला पूर्ण विराम मिळेल अशी आशा आहे.

 

ट्विटर वर टॉप ट्रेंड

बॉलिवूडचा होरो सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आगामी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करतो आहे. आता या चित्रपटाचे नाव लवयात्री करण्यात आले आहे. या चित्रपटाचा मोठ्या दिमाखात ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. या सोहळ्याला सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान अशा सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सलमान खानच्या हस्ते ‘लवयात्रीचा’ ट्रेलर लॉन्च करण्यात आला. दरम्यान हा ट्रेलर सलमान खानने त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंट वरून देखील शेअर केला होता . ‘लवयात्री’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच. लवयात्री ट्विटर वर टॉप ट्रेंड ठरला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0dae1905-bbdd-11e8-b7fa-830355450be2′]

या ट्रेलरमध्ये आयुष शर्मा आणि त्याची हिरोईन वरीना हुसैन यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास बसत नाही.

गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवयात्री ‘ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते.

अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवयात्री ‘ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

[amazon_link asins=’B01FXJI1OY,B079X1JSR7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’deeac494-bbe6-11e8-89b0-411f9703fdf0′]