दुचाकीस्वारानं पोलिसाच्या कानशिलात लगावली, पोलिसांनी पुढं केलं ‘असं’ काही

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन –   ई- चलानद्वारे कारवाई करण्याकरिता वाहतूक पोलिसांने फोटो काढल्याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने वाहतुक पोलिसाच्या कानशिलात लगावली. डोंबवली येथे शुक्रवारी (दि.11) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

देवरत नाडार (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली वाहतूक पोलीस हवालदार शंकर कडू हे शुक्रवारी दुपारी कर्तव्यावर होते. मंजुनाथ हायस्कूलजवळ ते कार्यरत असताना दुपारी एकच्या सुमारास आरोपी नाडार हा दुचाकीवरून मशाल चौकाकडून पेंडसेनगरकडे जात होता. तो नियम मोडीत विरुध्द दिशेने आल्याने कडू यांनी त्यास थांबण्याचा इशारा दिला होता. परंतू तो भरधाव वेगात निघून जात असल्याचे निदर्शनास येताच ई- चलानद्वारे कारवाई करण्याकरिता त्याच्या दुचाकीचा फोटो काढला. याचा राग आरोपीस आल्याने त्याने दुस-या ठिकाणी त्याची दुचाकी उभी करून कडू यांनी फोटो काढला, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली.