One Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला मेसेज, ’एक कोटी द्या अन्यथा…’

गाझियाबाद : One Crore | इयत्ता सातवीत शिकणार्‍या 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर धमकी देणारा आणि एक कोटी रूपयांची (One Crore) मागणी करणारा मेसेज पाठवला. पैसे दिले नाही तर मुलांना मारले जाईल असेही या मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आई-वडिलांना मुलीचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे आणि अल्पवयीन मुलीविरूद्ध कोणतीही अ‍ॅक्शन घेतलेली नाही.

गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये राहणार्‍या एका इंजिनियरच्या व्हॉट्सअप नंबरवर एक मेसेज आला की, जर एक कोटी रुपये दिले नाही तर मुलगा आणि मुलीची हत्या करू. हा मेसेज वाचून तो व्यक्ती प्रचंड घाबरला आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजले की, इंजिनियरच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज त्यांच्याच लॅपटॉपवरून केला गेला होता. पुढे तपास करताना घरातील 11 वर्षाच्या मुलीसोबत पोलिसांनी चर्चा केली. मुलीने पोलिसांना सांगितले की, हा मेसेज तिनेच वडिलांच्या लॅपटॉपवरून इंटरनेट मेसेजिंगद्वारे केला होता.

मुलीने पोलिसांना सांगितले की, मम्मी-पापा मोबाइल वापरू देत नाही आणि ओरडतात, म्हणून मला
राग आला आणि वडिलांच्या लॅपटॉपचा वापर करून त्यांच्या फोनवर एक कोटी मागणारा मेसेज पाठवला.

जेव्हा आई-वडिलांना त्यांच्या मुलीचा हा उद्योग समजला तेव्हा त्यांनी पुढील कारवाई न करण्याची
विनंती केली. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात आई-वडिलांना सल्ला दिला की, मुलीसोबत वागण्यात बदल करा आणि तिचे समुपदेशन करा.

हे देखील वाचा

Pocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नाही, पॉक्सो कोर्टाचा निर्णय

Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  one crore | minor daughter demanded one crore sending message to father by laptop

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update