‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक बाईक लवकरच होतेय लॉन्च, फुल चार्जिंगमध्ये 110 KM ची रेंज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वन इलेक्ट्रीक या स्वदेशी कंपनीनं घोषणा केली आहे की, लवकरच भारतात त्यांची इलेक्ट्रीक बाईक केली जाणार आहे. क्रीडन (Kridn) असं या बाईकचं नाव असणार आहे. संस्कृत शब्द क्रीडनवरून प्रेरीत असं हे नाव आहे. ही बाईक सर्वात वेगवान बाईक म्हणून समोर येणार आहे. कंपनीनं नुकतीच या बाईकच्या ऑन रोड ट्रायल शिवाय अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक पूर्णपणे मेड इन इंडिया असणार आहे.

केवळ 4 शहरात लाँच
कंपनीनं सांगितलं की, क्रीडनची डिलीव्हरी ही ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली जाणार आहे. ही बाईक सर्वात आधी 4 शहरात लाँच केली जाणार आहे. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर आणि हैदराबाद या 4 शहरातच बुकिंग रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, शहरात वापर करण्यासाठी क्रीडन ही फ्लॅगशीप बाईक असणार आहे.

बाईकचा टॉप स्पीड 95 किमी प्रति तास
क्रीडनमध्ये 3केडब्ल्यूएच लिथियम बॅटरी आणि 5.5 केडब्ल्यूची इलेक्ट्रीक मोटार दिली आहे. ही मोटार 165 एनएमचा टॉर्क देते. इको मोडमध्ये ही बाईक 110 किमी पर्यंत धावते. नॉर्मल मोडमध्ये ही रेंज कमी होऊन 80 किमी पर्यंत धावते. बॅटरी चार्ज होण्यासाठी हिला 4 ते 5 तास लागतात. या बाईकचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास एवढा आहे.

मेड इन इंडिया इलेक्ट्रीक बाईक
वन इलेक्ट्रीकच्या माहितीनुसार, क्रीडन ला इन हाऊस बनवलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 0 ते 60 किमीचा वेग पकडण्यासाठी केवळ 8 सेकंदाचा वेळ घेते. ही बाईक गियरलेस असणार आहे. यात फ्रंट सस्पेंशन टेलिस्कोपिक हायड्रोलिक आणि रियर हायड्रोलिक मिळणार आहे. बाईकमध्ये ट्युबलेस टायर असणार आहेत. यात डिजीटल क्लस्टर, ऑप्शनल जीपीएस आणि ॲप कनेक्टचे फीचर मिळणार आहे.

किती असेल या बाईकची किंमत ?
कपंनी क्रीडन आर नावानं एक नवीन बाईक लाँच करत आहे. क्रीडनचे एक एन्ट्री लेवल मॉडेल असणार आहे. यात 2 केडब्ल्यूची मोटार दिली जाणार आहे. यात 75 किमी प्रति तासांचा टॉप स्पीड असणार आहे. ही बाईक पुढील वर्षापर्यंत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. वन इलेक्ट्रीकनं क्रीडनची एक्स शोरूम किंमत ही 1.29 लाख रुपये ठेवली आहे.