One Nation One Election | ‘वन नेशन वन इलेक्शन’ मोहिमेवरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपाला टोला; “इंडिया आघाडीला घाबरुनच…”

पोलीसनामा ऑनलाइन – One Nation One Election | आज राज्यातील सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष अशा दोघांच्या महत्त्वपूर्ण बैठकी पार पडणार आहेत. मुंबईमध्ये चालू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची (I.N.D.I.A.) दोन दिवसीय बैठक पार पडत आहे. तर सत्तेमध्ये असणाऱ्या शिंदे गट ( Shivsena Shinde Group), अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group ) व भाजपा (BJP Maharashtra) या महायुतीची देखील बैठक पार पडणार आहे. सत्ताधाऱ्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवर कालपासून निशाणा साधला आहे. आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) ‘एक देश एक निवडणूक’ या मोहिमेवर (One Nation One Election) जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’ अशा मोहिमेचा विचार केला जात आहे. मात्र आता यावरुन विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. इंडियाच्या आघाडीच्या बैठकीनंतर मोदी सरकार (Modi Government) विचलित झाले असल्याने अशी प्रयोग करत असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ या केंद्र सरकारच्या (Central Government) मोहिमेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झालं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला बहुमताचा आकडा गाठणं शक्य आहे का? सध्या 12 राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आहेत. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करणं आणि बहुमताचा आकडा गाठणं सरकारला शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील समितीला यावर काम करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागेल. तोपर्यंत डिसेंबर महिना उजडेल.” असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.

ते पुढे म्हणाले की, “12 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय आणि त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानात (Indian Constitution) बदल करता येत नाही. असं करायचं असेल तर एक तृतीयांश बहुमत लागतं. तो आकडा भाजपाकडे आहे का? अदाणी प्रकरणावर राहुल गांधींनी जो बॉम्ब टाकला, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न मोदी सरकारचे चालू आहेत”, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

इंडिया आघाडीच्या एकजुटीला मोदी सरकार घाबरले असल्याचे देखील ते म्हणाले.
“‘इंडिया’च्या माध्यमातून विरोधकांची ताकद एकत्रित होत आहे. त्याला घाबरुन भाजपात (BJP India) अशाप्रकारचा विचलितपणा निर्माण झाला आहे. यामुळेच सिलिंडरचा दर दोनशे रुपयांनी कमी झाला.
हा प्रयोग देखील त्याचाच एक भाग आहे. तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गॅसचे
दर कमी झाले होते. मग तेव्हाच केंद्राने गॅसचे दर कमी का केले नाहीत? आता डिझेल पण 60 रुपयांवर आणतील,
अशी शक्यता आहे. पराजय पुढे दिसल्यानंतर हे सगळे विचलित झाल्याचे प्रयोग आहेत,
अशी परिस्थिती नाकारता येत नाही अशा शब्दामध्ये विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवावर यांनी मोदी सरकार
आणि त्यांच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विचारांवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारतील ‘वन नेशन वन इलेक्शन’ (One Nation One Election) ही एक मोहिम आहे.
देशामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये निवडणूका चालू असतात.
याचा परिणाम सरकारच्या कार्यावर देखील होतो. सततच्या इलेक्शनमुळे वेळ, पैसा खूप खर्च होता.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘एक देश, एक निवडणूक’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.
यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एका
उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ हे तत्व देशाभरामध्ये प्रत्यक्षात अमलात
येऊ शकतं का? आणि त्यासाठी कोणत्या तरतुदी, उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेऊन ही समिती
केंद्र सरकारला शिफारशी करणार आहे. या आधी मोदी सरकारकडून ‘वन नेशन वन टॅक्स’ (One Nation One Tax)
ही मोहीम यशस्वीरित्या चालवण्यात आली असून आता ‘वन नेशन वन इलेक्शन’ या मोहिमेचा विचार केला जात आहे.
मात्र यावर विरोधक जबरदस्त विरोध करत असून टीका देखील करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)