14 ते 17 जानेवारी दरम्यान ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रिथ वर्कशॉप !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेतर्फे ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रिथ वर्कशॉप येत्या 14 ते 17 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या वर्कशॉपचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे की, मकर संक्राती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय वर्कशॉपमध्ये संस्थेचे संस्थापक गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे एक लाईव्ह सेशन असणार आहे. हे या वर्कशॉपचे वैशिष्ट्य आहे. सर्वांच्या सोयीनुसार वर्कशॉपच्या बॅचेस् असतील. याच वर्कशॉपमध्ये संस्थेच्या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे अद्वितीय अशी सुदर्शन क्रिया शिकवण्यात येणार आहे. सुदर्शन क्रियेमुळे ताणतणाव, थकवा, नैराश्य, राग, नकारात्मक विचार, दूर होतात. आजपर्यंत लाखों लोकांना याचा फायदा झाला आहे. म्हणनूच जास्तीत जास्त लोकांनी या वर्कशॉपसाठी नोंदणी करावी. वर्कशॉप ऑनलाईन असल्यामुळे घर बसल्या अथवा जिथे असु तेथून सहभाग नोंदवता येईल.

https://www.instagram.com/p/CJ6DzDKJYPC/?utm_source=ig_web_copy_link

कोणत्या वेळी वर्कशॉप होईल ?

सकाळी 6.30 – 8.30
नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
aolt.in/525793

दुपारी 3.00 – 5.00
नोंदणीसाठी लिंक aolt.in/525796

संध्याकाळी 7.00 – 9.00
नोंदणीसाठी लिंक aolt.in/528100

अधिक माहितीसाठी 8999053707, 9860151522 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे.