Online Rummy | हायकोर्टचा मोठा निर्णय; म्हणाले – ‘ऑनलाइन रमी एक कौशल्यपूर्ण खेळ, यावर बंदी घालणे असंवैधानिक’

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था –  Online Rummy | केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) आज ऑनलाइन रमीला (Online Rummy) कौशल्यसंबंधीत खेळ म्हणत त्यावर बंदी घालणे (ban) असंवैधानिक असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती टी. आर. रवी (Judge T.R. Ravi) यांच्या एकल पीठाने राज्य सरकारच्या बंदीविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला आहे..

कोर्टाने म्हटले की, रमीसारख्या (Online Rummy) पैशांसाठी खेळल्या जाणार्‍या कौशल्याच्या ऑनलाइन गेमवर बंदी घालणे मनमानी आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
कोर्टाने सरकारच्या नोटिफिकेशनला (kerala government notification on rummy bill) असंवैधानिक म्हणत यावर बंदी घालण्यास नकार दिला.

केरळ सरकारने घातली होती बंदी

याचिकाकर्त्यांनी केरळ सरकारच्या 23 फेब्रुवारी 2021 ला जारी आदेशाला आव्हान दिले होते.
सरकारने केरळ गेमिंग कायदा, 1960 च्या तरतुदी अंतर्गत राज्यात ऑनलाइन रमीवर बंद घातली होती.

सुप्रीम कोर्टाने केले होते मान्य

कोर्टात याचिकाकर्त्यांनी आंध्र प्रदेश राज्य विरूद्ध के सत्यनारायण आणि इतर के.आर. लक्ष्मणन आणि तमिळनाडु राज्य आणि इतरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या (supreme court) निर्णयाचा संदर्भ दिला होता.
या निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केले होते की, रमी प्रामुख्याने कौशल्याचा खेळ आहे.

म्हणून राज्याचा कायदा लागू होत नाही

यासोबत सुप्रीम कोर्टाने मान्य केले होते की, ज्या खेळांमध्ये यश पूर्णपणे कौशल्यावर अवलंबून आहे त्यास जुगार मानता येणार नाही.
यासाठी रमीवर राज्याच्या जुगार आणि गेमिंग कायद्यांतर्गत बंद घालता येणार नाही.

 

रमीतील लाभ व्यवसायाप्रमाणे – याचिकाकर्ता

याचिकाकर्त्यांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटले की डाव लावून खेळल्या जाणार्‍या कौशल्यपूर्ण ऑनलाइन रमीमधून याचिकाकर्त्यांना जो लाभ होत आहे.
तो एका व्यवसायाप्रमाणे आहे. यासाठी यास भारताच्या संविधानाच्या कलम 19 (1) (जी) च्या अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे.

कोर्टाच्या आदेशानंतरच घातली होती बंदी

 

केरळ सरकारने बंदीचा निर्णय हायकोर्टच्या त्या डायरेक्टिव्हनंतर घेतला होता ज्यामध्ये राज्य सरकारांना ऑनलाइन रमी बिझनेसविरूद्ध पावले उचलण्यास सांगितले होते.
हायकोर्टने या प्रकरणाची सुनावणी करताना भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि अभिनेत्री तमन्नाला (actress tamanna bhatia) नोटीस जारी केली होती.

हे दोन्ही सेलिब्रिटी मोबाइल प्रीमियर लीग (mobile premier league) ची जाहीरात करतात. एमपीएल ऑनलाइन (MPL Online) रमी आणि दुसरे पत्त्यांचे खेळ आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करते.

 

Web Title : Online Rummy | big decision of kerala high court said online rummy is a skill game ban on it is unconstitutiona

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sultan Died | 21 कोटींची बोली लागलेल्या धडधाकट ‘सुल्तान’चे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन; मालक बेनीवालांचा दावा

Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ