Sultan Died | 21 कोटींची बोली लागलेल्या धडधाकट ‘सुल्तान’चे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन; मालक बेनीवालांचा दावा

पंजाब : वृत्तसंस्था – पंजाब (Punjab) येथील धडधाकट असणारा रेड्याचं निधन झालं आहे. सुल्तान असं त्या रेड्याचं नाव आहे. सुल्तानची मागील काही महिन्यापुर्वी चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वत्र प्रसिद्ध असणारा हरियाणातील कैथल जिल्ह्यातील सुलतान (Sultan Died) नावलौकीक आहे. विशेष म्हणजे नुकतंच या रेड्याला 21 कोटी रुपयांची बोली लागली होती. दरम्यान, हा प्रसिद्ध सुल्तान (Death of the Sultan) 14 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला आहे. सुल्तानचे ह्रदविकाराच्या (Heart disease) झटक्याने निधन (Sultan Died) झाल्याने मालक नरेश बेनीवाल (Owner Naresh Beniwal) यांना मोठा धक्का बसला आहे.

सुल्तानच्या निधनाने सर्वत्र दुख व्यक्त होत आहे. सुल्तानसारखा कोणीही नव्हता आणि कदाचित पुढेही कोणीही नसेल. सुल्तानमुळेच बेनीवाल यांची एक विशेष ओळख निर्माण झाली होती. असं मालक नरेश बेनीवाल (Owner Naresh Beniwal) यांनी म्हटलं आहे. सुल्तानमुळे जगभरात त्याचे आणि त्याच्या मालक बेनीवालचे नाव प्रसिद्धी रुपात आले होते.

उत्पन्नाच्या बाबतीतही सुल्तानचं महत्त्व आणि वेगळीच ओळख होती. सुल्तानच्या माध्यमातून त्याचा मालक वर्षाला अंदाजे 90 लाख रुपये कमवायचा. देशभरात याची चर्चा होती. दरम्यान, सुलतान एक ऐश आराम जीवन जगला होता. सुलतान दररोज 10 किलो दूध प्यायचा आणि सुमारे 15 किलो सफरचंद खात असे. हिवाळ्यात तो रोज 10 किलो गाजर खात असे. त्याच्यासाठी केळी आणि तुपाचा डोस वेगळा दिला जायचा. सुलतानचा रोजचा खर्च 2 हजार पेक्षा अधिक होता. तर, कधी-कधी 3 ते 4 हजार असायचा.

दरम्यान, एका प्रदर्शनामध्ये सुल्तानसाठी तब्बल 21 कोटी रुपयांची बोली लागली होती.
पण, मालक नरेश बेनीवाल यांनी त्याला विकण्यास नकार दिला.
सुल्तानचे मालक त्याच्यावर अतिशय़ जीवापाड प्रेम करत होते.
आणि त्याच्या खाण्या-पिण्यात देखील कधी कमी करत नसत.
मात्र सुलतानच्या जाण्याने मालकाला दुःख अनावर झालं (Sultan Died) आहे.

Web Title :- Sultan Died | death sultan who had bid rs 21 crore great sorrow owner beniwal haryana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ

Rajya Sabha Byelection | भाजपचा मोठा निर्णय ! काँग्रेसच्या विनंतीला मान देत भाजपची ‘या’ निवडणूकीतून माघार