SBI कडून ग्राहकांना ‘सावधान’तेचा इशारा ! पैसे सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ पासून दूर रहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ४२ कोटीहून अधिक ग्राहकांना सावध केले आहे. अशा घटनांपासून वाचण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. बँकेने यासंदर्भात ग्राहकांना सावध करताना सांगितले आहे कि, आपले पैसे आणि वेळ सोशल मीडियावरील फेक अकाउंटवर वाया घालवू नये, या अशा खोट्या वेबसाइट्सपासून ग्राहकांनी सावध राहावे. यासाठी बँकेने आपले अधिकृत सोशल मीडिया आणि व्हेरीफाईड ऑफिशियल हॅण्डल किंवा टॅगलाच फॉलो करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.

अशा प्रकारे ओळखा खोटे अकाउंट
यासंदर्भात एसबीआयने ट्विट करत ग्राहकांना सावध करताना म्हटले आहे कि, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही बँक अधिकाऱ्याला टॅग करण्याआधी किंवा त्याच्याशी चॅटिंग करण्याआधी ते व्हेरीफाईड आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. आजकाल सोशल मीडियावर अकाउंट बनवणे फार सोपे झाले आहे, त्यामुळे ग्राहकांनी या अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. यासाठी बँकेने आपले अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल्स दिले आहेत.

हे अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल्स पुढीलप्रमाणे :
१)Facebook: @StateBankOfIndia

२)Instagram: @theofficialsbi

३)Twitter: @TheOfficialSBi

४)Linkedin: State Bank of India (SBI)

५)Google+: State Bank of India

६)YouTube: State Bank of India

७)Quora: State Bank of India (SBI)

७)Pinterest: State Bank Of India

दरम्यान, त्याचबरोबर बँकेने दोन टोल-फ्री नंबर ग्राहकांसाठी दिले असून काही तक्रार असल्यास या दोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बँकेने केले आहे. 1800112211 आणि 18004253800 हे दोन क्रमांक बँकेने आपल्या ग्राहकांसाठी दिले आहेत.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा