आता तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी, सुरु होतोये EaseMyTrip चा IPO, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्हीदेखील तुमच्या पैशांवर चांगला रिटर्न मिळू इच्छित आहात तर तुम्हाला मार्च महिन्यात अनेक ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’ (IPO) मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी मार्च महिना फायद्याचा ठरू शकणार आहे. IPO साठी गुंतवणूकदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे.

आता ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईट ‘ईजी माय ट्रिप’ही (EaseMyTrip) IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून येत्या काही दिवसांत म्हणजेच 8 मार्चला IPO आणली जाणार आहे. हे 10 मार्चपर्यंत गुंतवणुकीसाठी खुले राहणार आहे. त्यासाठी EaseMyTrip मध्ये IPO आणणारी देशातील पहिली ऑनलाईन ट्रॅव्हल फर्म बनणार आहे.

जाणून घ्या EaseMyTrip IPO बाबत…

–  ऑनलाइन ट्रॅव्हल एजेंसी EaseMyTrip 8 मार्चपासून सुरु.

–  गुंतवणूकदारांजवळ IPO मध्ये 10 मार्च 2021 पर्यंत गुंतवणूकीची संधी.

–  अँकर बुकिंगसाठी 5 मार्चला एक दिवस उघडणार आहे

–  कंपनी 510 रुपयांनी जमवण्यासाठी ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’ (आईपीओ) लॉन्च करणार आहे.

–  इश्यूसाठी प्राइस बँड (Price Band) 186-187 रुपये प्रति शेयर

–  ईजी ट्रिप प्लानर्स पूर्णपणे एक ऑफर-फॉर-सेल (OFS) आहे. प्रमोटर्स निशांत पिट्टी आणि रिकांत पिट्टी यांनी 255 कोटी रुपयांपर्यंत शेअर विकणार आहे.