SBI नं ग्राहकांना केलं सावध ! चुकूनही करू नका ‘या’ अ‍ॅपचा वापर, अन्यथा रिकामं होईल तुमचं बँक खाते

पोलीसनामा ऑनलाईन टीम : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने अनाधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात येणार्‍या लोन स्कीमच्या अमिषाला बळी पडणार्‍या ग्राहकांना सावध केले आहे. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर सिक्युरिटी टिप्स जारी करत ग्राहकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अशा अ‍ॅप्सपासून वाचण्याचे उपाय सांगितले आहेत.

एसबीआयने सांगितल्या सेफ्टी टिप्स
एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे, सायबर गुन्हेगारांच्या इन्स्टंट लोन अ‍ॅप्सपासून सावध राहा. प्लीज कोणत्याही अशा लिंकवर क्लिक रू नका जे अनाधिकृत आहे आणि आपली कोणतीही माहिती अशा अ‍ॅपवर भरू नका, ज्यामुळे एसबीआय किंवा दुसर्‍या बँकेप्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे. अशा लिंक्सवर क्लिक करताच यूजरचा प्रायव्हेट डेटा लिक होऊ शकतो.

एसबीआयने एक लिंकसुद्धा शेयर केली आहे ज्यावर ग्राहकांना त्यांच्या सर्व आर्थिक गरजांसंबंधी उत्तरे मिळू शकतात. यासोबतच एसबीआयकडून काही सेफ्टी टिप्स सुद्धा शेयर करण्यात आल्या आहेत.

एसबीआयने ज्या सेफ्टी टिप्स शेयर केल्या आहेत त्या अशाप्रकारच्या आहेत 
* जी ऑफर आहे त्यासाठी नियम आणि अटी चेक करा.
* कोणत्याही संशयित लिंक क्लिक करू नका. कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वसनियता चेक करा.
* आपल्या सर्व आर्थिक गरजांसाठी या लिंकवर क्लिक करा –
https://bank.sbi for all your financial needs

आरबीआयने सुद्धा दिला इशारा
बँक, नॉन बँकिेंग वित्तिय कंपन्या ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सोबत रजिस्टर्ड आहेत, त्यांच्याकडून कायदेशीर प्रकारे कर्जाचे सादर केले जाऊ शकते. यासोबत राज्य सरकारांसोबत रजिस्टर्ड युनिट सुद्धा कर्ज देऊ शकतात. मागील महिन्यात आरबीआयने व्यक्ती आणि छोट्या उद्योगांना वॉर्निंग दिली होती की, कोणत्याही प्रकारच्या अनाधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या फसवणुकीला बळी पडू नका.