वैद्यकीय प्रवेशासाठी फक्त NEET परीक्षा, अन्य परीक्षा रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता फक्त एक परीक्षा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय प्रवेश आणि पात्रता परीक्षा (NEET) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या व्यतीरिक्त इतर वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्ययार्थ्यांना आता फक्त NEET परीक्षा द्यावी लागेल आणि त्यामध्ये पात्र होणे आवश्यक आहे. हा निर्णय आज (बुधवार) कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटच्या बैठकीत याची माहिती दिली. मात्र, ऑल इंडीया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स (AIIMS) साठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार का हे सांगण्यात आले नाही. जावडेकर यांनी सांगितले की, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसकरिता परवाना मिळवण्यासाठी वेगळी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) प्रवेश घेण्यासाठी वेगळी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यासोबत डीएम/एमसीएच मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट-सुपर स्पेशालिटीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !