4G डाउनलोडिंग स्पीडमध्ये ‘एयरटेल’ने मारली बाजी, Jio ‘या’ क्रमांकावर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओपन सिग्नल रिपोर्टच्या ताज्या आकडेवारीनुसार, एयरटेलने 4 जी डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत जीओला मागे सोडले आहे. या रिपोर्टच्या अनुसार, 2019 मध्ये एयरटेलचा सरासरी डाउनलोडींग स्पीड हा 9.6Mbps होता. तर 7.9Mbps च्या स्पिडसह वोडाफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयडिया या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असून 6.7Mbps च्या स्पिडसह जिओ चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

4 जीच्या उपलब्धतता बाबत बोलायचे झाल्यास जिओ सर्वात पुढे असून 97.8 टक्के जीओची बाजारात उपलब्धतता असून एयरटेल 89.2 टक्के, वोडाफोन 76.9 टक्के तर आयडिया 77.4 टक्के आहे. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, देशातील 32 शहरांतील 98 टक्के नागरिकांकडे जिओचे 4 जी कनेक्शन आहे. हा रिपोर्ट देशातील 42 शहरांमधील 76.77 लाख मोबाईलद्वारे करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

You might also like