पोस्ट ऑफिसची धमाकेदार ‘स्कीम’ ! अवघ्या १० रुपयात खातं उघडून मिळवा बँकेपेक्षाही अधिक व्याज आणि ‘या’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस आपल्याला नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्यात केवळ १० रुपयांमध्ये खातं उघडता येणार आहे.

पोस्टातील बचत योजनांपैकी (Recurring Deposit) ही एक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करणे ही सर्वात सोपी तसेच इतर बचत योजनांच्या तुलनेत येथे ठेवींवर अधिक व्याज मिळते. पोस्ट ऑफिसने आरडी योजनेत ग्राहकांना मासिक हप्ते ऑनलाईन करण्याची सुविधा दिली आहे. हे ऑनलाईन हप्ते भरण्यासाठी पोस्ट ऑफिसने पोस्ट पेमेंट्स बँकेत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आरडी खात्यातून पोस्ट ऑफिसवर ग्राहकांना आयपीपीबीशी (IPPB) लींक करावे लागेल. त्यानंतर आरडीची मासिक हप्ता ऑनलाइन आयपीपीबी खात्यातून किंवा आयपीपीबी अ‍ॅप (IPPB App) कडून अदा केली जाऊ शकते.

आरडी योजनेचे फायदे –

आरडी गुंतवणूकदाराच्या बचतीवर अवलंबून असते आणि त्यात दरमहा निश्चित रक्कम गुंतवता येते.
आरडीच्या ‘लॉक इन फीचर’ नुसार सुरुवातीपासून अंतिम मुदतीपर्यंत व्याजदर समान राहतो. डिपॉजिटवर व्याजदर सुरुवातीला ‘लॉक इन’ होऊन जातो. म्हणजेच व्याजदर कमी असेल तर आरडीचा फायदा होतो.
आरडी मधील खाते उघडताना कालावधी निश्चित केली जाते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला व्याजासहित रक्कम मिळते.
आरडीची मदत १० वर्षांपर्यंत असू शकते. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक योजना बनविली जाऊ शकते.

बँकेपेक्षा मिळणार अधिक नफा –

देशातील सर्वात मोठी बँक असणारी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आरडीवर ६. ८० ते ६. ८५ % व्याज देते. तर पोस्ट ऑफिस दरवर्षी ७. ३० % व्याज देते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडीचा कालावधी ५ वर्ष असेल तर बँकामध्ये तुम्ही तो १ ते १० वर्ष निवडू शकता.

असे उघडा खाते –

पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खोलने खूप सोपे आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही आरडी उघडू शकता. त्यामध्ये तुम्ही एक किंवा अधिक खाती उघडू शकता. हे खाते लहान मुलांच्या नावेही उघडता येते. १० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारी मुले स्वतः हे खाते वापरू शकता. तसेच आरडीमध्ये जॉईंट अकाउंटही उघडता येते.