सहकारी बँक क्षेत्रातील सरकारच्या हस्तक्षेपास विरोध करा

मुंबई : पोलीसनामा

सहकार चळवळीच्या लोकशाही तत्त्वाला छेद देण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
[amazon_link asins=’B006526G50′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05b50408-9317-11e8-9273-0b1cc7acc12d’]
दि महानगर सहकारी बँक लिमिटेड बँकेचे नामांतर गुलाबराव शेळके महानगर सहकारी बँक असे करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, सहकार चळवळीने सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी दिली. परंतु सहकार चळवळीच्या लोकशाही तत्त्वाला छेद देण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहे. केद्र सरकारने नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशिवाय नवे व्यवस्थापकीय मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेच्या या संदर्भातील परिपत्रकाला माझा विरोध आहे. सभासद हे सार्वभौम असून ते ठरवतील तसा कारभार व्हायला हवा. सरकारतर्फे होणाऱ्या हस्तक्षेपास सर्व सहकारी बँकांनी एकमुखाने विरोध करावयास हवा असे आवाहन त्यांनी केले.