Opposition Party Meeting | विरोधकांच्या बैठकीत काय ठरलं? ठाकरे-पवार यांनी सांगितली पुढची रणनिती; म्हणाले-‘विचारधारा वेगळी असली तरी…’

पाटणा : वृत्तसंस्था – Opposition Party Meeting | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विजयी हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेससह (Congress) देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजूट दाखवली आहे. आजच्या बैठकीत 15 विरोधी पक्षांनी एकत्र येत पाटणा येथून रणशिंग फुकले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली असल्याचे समजते. बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद (Opposition Party Meeting) घेऊन सत्ताधारी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच लोकसभेच्या निवडणुका लढवू, असा विश्वासही विरोधकांनी व्यक्त केला आहे.

आणखी एक बैठक होईल – नितीश कुमार

एकत्र राहयचं ठरलं आहे, सर्व पक्षांची आणखी एक बैठक होईल. एकत्र निवडणूक लढवण्याबाबत संमती झाली. आणखी एक बैठक होईल, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) ही बैठक बोलावतील. या बैठकीत पुढे काय करायचं आहे, कोण कुठे लढेल? याला अंतिम रुप येईल, असं नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी सांगितलं. तसेच सध्याचं सरकार देशाच्या हिताचं काम करत नाहीये, अशी टीका नितीश कुमार यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सर्वांना एकत्रित केल्याबद्दल नितीश कुमार यांचे आभार. देशातील प्रमुख पक्षांचे प्रमुख आज इथे एकत्र (Opposition Party Meeting) आले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपासून सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वांना माहिती आहे की, वेगवेगळे पक्ष आहेत, विचार वेगळे आहेत पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी आणि देशाची एकता तथा अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. याच्यापुढे देशाच्या प्रजातंत्रावर जो कोणी आघात करेल त्याचा आम्ही विरोध करु. जे देशद्रोही आहेत आणि तानाशाही लावू पाहत आहेत त्यांना आम्ही विरोध करुच. तसेच विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

मतभेद असतील पण…- शरद पवार

देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्र लढले पाहिजे, मतभेद असतील पण देशासाठी एकत्र लढले पाहिजे. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इथूनच संदेश देण्यात आला होता. तिथूनच देशभरात आंदोलन गेलं. देशाची जनता याला समर्थन देईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

देशाला गोडसेंचा देश होऊ देणार नाही

गांधींच्या देशाला गोडसेंचा देश होऊ देणार नाही. देशामध्ये जे चाललं त्याची प्रयोगशाळा काश्मीर आहे. काश्मीरनंतर सगळ्या गोष्टी देशभरात केल्या जातात, असा आरोप मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला.

आम्हाला इतिहास सुरक्षित ठेवायचा आहे – ममता बॅनर्जी

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Bengal CM Mamata Banerjee) म्हणाल्या,
पाटण्यातून जी आंदोलनं सुरु झाली ती नंतर मोठी झाली हा इतिहास आहे.
त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला.
आम्ही सर्व एक आहोत, आम्ही एकत्रित लढणार आहोत, आम्हीही देशभक्त आहोत,
पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत.
कुणी सरकारच्या विरोधात बोललं तर त्याच्या विरोधात ईडी (ED), सीबीआय (CBI) लावली जाते.
पण देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांवर काहीही बोललं जात नाही.
जर 2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आलं तर त्यांनंतर देशात निवडणुका होणार नाहीत हे नक्की.
भाजपला इतिहास संपवायचा आहे. पण आम्हाला इतिहास सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आम्ही लढत राहू असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Web Title :   Opposition Party Meeting | shivsena uddhav balasaheb thackeray party chief uddhav thackeray said after the opposition meeting in patna that we have come together to save the country even though we have different ideologies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall