Oral Health | चुकूनही तोंडात बर्फ घेऊन चावू नका, ठरू शकते भयंकर! एक्सपर्टने दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Oral Health | अनेक लोकांना बर्फ (Ice) खायला आवडतो. लहानपणी तुम्हीही फ्रीजमधून काढून बर्फाचे तुकडे खाल्ले असतील. बरेच प्रौढ देखील असे करतात, परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. याबाबत एका तज्ज्ञाने सोशल मीडियावर (Social Media) इशारा दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, बर्फाचा तुकडा तोंडात टाकून चघळणे धोकादायक ठरू शकते. ते कसे हानिकारक ठरू शकते हे त्यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले (Oral Health) आहे.

 

डेंटल हायजिनिस्टने (Dental Hygienists) दिला इशारा
न्यूयॉर्कमधील डेंटल हायजिनिस्ट एव्हलिन (New York Dental Hygienist Avalene) टिकटॉक (TickTock) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) सक्रिय आहे. अल्विनने एक व्हिडिओ शेअर करून, बर्फ खाल्ल्यानंतर त्याचा दातांवर काय परिणाम (Effects on teeth) होतो? हे लोकांना सांगितले. एव्हलिनने सांगितले की जर तुम्ही बर्फ खाल्ला तर तुमचे दात फुटण्याची शक्यता खुप वाढते. एव्हलिनने एक व्हिडिओ बनवला आणि शेअर केला, ज्यामध्ये बर्फ खाताना दातांना काय होते हे दाखवण्यात आले आहे. यासोबतच तिने लोकांना बर्फ न खाण्याचा सल्ला दिला (Oral Health) आहे.\

 

होऊ शकतात दात आणि तोंडाशी संबंधित समस्या (Tooth and Mouth Problems)
त्याच वेळी, मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, बर्फ खाल्ल्याने दातांना तडे जातात आणि तोंडाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. जास्त बर्फ खाल्ल्याने दातांच्या इनॅमलला (Teeth Enamel) हानी पोहोचते आणि दात गळतात. नंतरच्या काळात, संवेदनशीलता आणि वेदना यासारख्या तोंडाच्या अनेक समस्या देखील उद्भवू लागतात. यासोबतच अ‍ॅनिमियाची समस्या (Anemia Problem) आणि आहारासंबंधी अनेक समस्याही (Dietary Problem) होऊ लागतात.

 

डेंटल टिप्सही (Dental Tips) देते एल्विन
आल्विन तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दातांच्या समस्यांचे व्हिडिओ (Dental Problems Videos) शेअर करते.
या व्हिडिओंमध्ये, ती दातांच्या समस्यांची कारणे आणि उपाय सांगते. याशिवाय ती लोकांना दातांच्या टिप्सही देते.
व्हिडिओच्या माध्यमातून ती लोकांना काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगते.
याशिवाय एल्विन दातांच्या स्वच्छतेसंबंधित अनेक रहस्ये लोकांसोबत शेअर करते.

 

Web Title :- Oral Health | chewing ice is bad for your oral health warns dental expert
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | पॉलिसी होल्डर्स ‘या’ 2 गोष्टींशिवाय इश्यूमध्ये करू शकत नाहीत गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

 

Madhuri Dixit | 54 वर्षीय माधुरी दीक्षितनं घातला एकदम पातळ पट्टीचा ‘कडक’ बोल्ड ड्रेस, ‘धक-धक गर्ल’चा बोल्डनेस पाहून सारेच घायाळ

 

Rahul Bajaj Net Worth | राहुल बजाज यांनी मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; Bajaj Chetak ला बनवले होते प्रत्येक घराची शान, जाणून घ्या त्यांच्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी