Rahul Bajaj Net Worth | राहुल बजाज यांनी मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; Bajaj Chetak ला बनवले होते प्रत्येक घराची शान, जाणून घ्या त्यांच्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rahul Bajaj Net Worth | देशातील दिग्गज उद्योगपती आणि बजाज समूहाचे (Bajaj Group) माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज निधन झाले (Rahul Bajaj Passes Away). वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. राहुल बजाज 1965 मध्ये बजाज समूहाचा एक भाग बनले. यानंतर त्यांनी कंपन्यांना एका नव्या उंचीवर नेले. राहुल बजाज यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली आहे. त्यांनी ऑटो क्षेत्रात (Auto Sector) नवी लाट आणली होती. फोर्ब्सच्या अहवालानुसार राहुल बजाज यांची एकूण संपत्ती (Rahul Bajaj Net Worth) 820 कोटी रुपये आहे.

 

50 वर्ष पार पाडली जबाबदारी
बजाज समूह स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आली होती. त्यांनी कंपनीत जवळपास 50 वर्षे सेवा केली. राहुल बजाज चेअरमन झाल्यानंतर कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेतही विशेष ओळख निर्माण केली.

 

चेतक स्कूटरची (Bajaj Chetak) मिळाली मोठी प्रसिद्धी
राहुल बजाज हे देशातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक होते. 2006 ते 2010 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्यही होते. याशिवाय त्यांनी कंपनीचे नेतृत्व करत असताना बजाज चेतक नावाची स्कूटर बनवली. या स्कूटरने खूप नाव कमावले आणि भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी तिला चांगला प्रतिसाद दिला. यानंतर कंपनीने सातत्याने नवीन उंची गाठली. (Rahul Bajaj Net Worth)

30 एप्रिल रोजी दिला होता राजीनामा
राहुल बजाज यांनी 30 एप्रिल 2021 रोजी बजाज समूहातील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. ते जवळपास 5 दशके बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी (Bajaj Group Of Companies) संबंधित होते. राहुल बजाज यांचा कंपनीतील उत्कृष्ट अनुभव आणि आस्था, तसेच सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि कंपनीला नवीन उंचीवर नेले.

 

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
2001 मध्ये राहुल बजाज यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय त्यांना ’नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ ही पदवीही देण्यात आली होती.
राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी 2017 मध्ये बजाज यांना जीवनगौरवसाठी सीआयआय अध्यक्षीय राष्ट्रपती पुरस्कार (CII President’s Award) दिला होता.

 

सेंट स्टीफन कॉलेजमध्ये घेतले शिक्षण
राहुल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते.
त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून (Sent Stiffen College) शिक्षण घेतले, कायद्याची पदवी घेण्यासाठी ते मुंबईत (Mumbai) आले होते.
राहुल यांचे वडील कमलनयन (Kamalnayan Bajaj) आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.

 

Web Title :- Rahul Bajaj Net Worth | bajaj group rahul bajaj net worth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा